मुखेड शहरातील उपजिल्हा रूग्णालयात रूग्णांना फळे वाटप
मुखेड, रणजित जामखेडकर| भारताचे माजी राष्ट्रपती, मिसाईलमॅन डॉ.ए.पी.जे.आब्दुल कलाम यांची जयंती सर्वत्र वाचन प्रेरणा दिन म्हणून उत्साहात साजरा केल्या जाते त्यानुषंगाने मुखेड येथिल डाॅ.एपीजे आब्दुल कलाम समाज सेवा समितीच्या वतीने शहरातील बल्खीनगर खंडोबा गल्ली येथे दि.१५ आॅक्टोबंर रोजी डाॅ.कलाम प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. त्यानंतर उपजिल्हा रूग्णालयातील रूग्णांना फळे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात महापुरूषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन करण्यात आली त्यानंतर मिसाईलमॅन डॉ.ए.पी.जे.आब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस डाॅ.एपीजे आब्दुल कलाम समाज सेवा समितीचे अध्यक्ष एस.के. बबल्लु, कोंडाजी मामु बागवान व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.याप्रसंगी आॅल इंडिया तन्जिम ए इन्साफचे तालुका समन्वयक महेताब शेख व एपीजे अब्दुल कलाम समाज सेवा समितीचे एस.के.बबल्लु यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी आब्दुलभाई सय्यद, शौकत होनवडजकर, शादुल होनवडजकर, शमशोदिन सय्यद, बबल्लु मुल्ला, गौस पठाण,रऊफ मुल्ला, मुनवर शेख, इब्राहिम शेख, जीलानी बंगाली, आब्दुल शेख, अलीम शेख, जावेद शेख,साजिद हाफीसाब बागवान, अनवर सयद, फेरोज सय्यद, साबेर बलखी, इरफान शेख, खदिर शेख,मुबिन बलखी,इब्राहिम चाऊस, इरफान महेताब शेख, इमरान महेताब शेख यांच्यासह डाॅ एपीजे आब्दुल कलाम समाज सेवा समितीचे पदाधिकारी व विविध संघटनेचे कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचलन महेताब शेख यांनी केले तर उपस्थितांचे आभार इम्रान अत्तार यांनी मानले.