किनवट, माधव सूर्यवंशी| दुर्बल, अल्पसंख्यांक समाजाला सामाजिक व आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे या एकमेव उद्देशाने महाराष्ट्र राज्य सामाजिक न्याय विभागाची निर्मिती करण्यात आली. या विभागामार्फत मिळणाऱ्या शासनाच्या योजना दुर्बल घटकातील प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहचविण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन समाज कल्याण नादेंड विभागाचे कनिष्ठ सहाय्यक डी .के .हटकर यांनी किनवट येथील गोंडवाना आदिवासी विद्यार्थी वस्तुगृह गोकुंदा येथील महाराष्ट्र राज्य सामाजिक न्याय विभागच्या 90 व्या वर्धापन दिन कार्यक्रमात ते बोलत होते.
किनवट /माहूर तालुक्यातील अनुदानित वस्तीग्रह अधीक्षक व कर्मचाऱ्यांच्या वतीने आज किनवट येथील महात्मा फुले विद्यार्थी वसतिगृहात महाराष्ट्र राज्य सामाजिक न्याय विभागाचा 90 वा वर्धापन दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला . त्यावेळी डि. के .हटकर अध्यक्ष स्थानावरून बोलत होते या कार्यक्रमास किनवट माहूर तालुक्यातील अधीक्षक विनायक भुवनजी कनाके गंगाराम कोंडीबाजी धुर्वे श्रीराम अंबुजी किनाके सो सिंधुताई शंकर गेडाम देविदास नारायण तर्फे अनिल मला जी भवरे सौ मंगला अविनाश वानखेडे सो सुनिता विजयानंद बागेश्वर माया भीमराव फुलेवार प्रल्हाद दत्ता एडके वनजाक्षी किशनराव निलावार दिगंबर दत्ता डोके यांची प्रामुख्याने उपस्थिती होती . प्रारंभी उपस्थित मान्यवरांनी महापुरुषांच्या प्रतिमेचे पुष्पपूजन करून अभिवादन केले.
पुढे बोलताना हटकर म्हणाले की सामाजिक न्याय विभागामार्फत राज्यातील दुर्बल व अल्पसंख्यांक समाजातील नागरिकासाठी विविध योजना राबविल्या जातात या योजनांच्या माध्यमातून दुर्बल घटकांना सामाजिक व आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्यास मदत होते. यावेळी वस्तीगृहाचे अधीक्षक व कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्याबरोबरच अधीक्षकांचे रखडलेले मानधन त्वरित देण्याचे आश्वासन हटकर यांनी दिले . कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक प्रदीप कांबळे यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अभिजीत बोनगीरवार यांनी केले या कार्यक्रमास किनवट माहूर तालुक्यातील समाज कल्याण वस्तीग्रहाचे अधीक्षक, कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. .