नांदेड| प्रवाश्यांची गर्दी लक्षात घेवून दक्षिण मध्य रेल्वे ने नांदेड विभागातून केरळ ला जाण्याकरिता नांदेड ते एर्नाकुलम दरम्यान नोवेंबर, डिसेंबर-2022 आणि जानेवारी-2023 महिन्यात विशेष गाडीच्या 26 फेऱ्या करण्याचे ठरविले आहे, ते पुढील प्रमाणे --
अनु क्र. | गाडी संख्या | कुठून-कुठे | प्रस्थान | आगमन |
नोवेंबर |
डिसेंबर |
जानेवारी | फेऱ्या |
1 | 07189 | नांदेड ते एर्नाकुलम | 15.00 | 20.15 | 4,11,18,25 | 2,9,16,23,30 | 6,13,20,27 | 13 |
2 | 07190 | एर्नाकुलम ते नांदेड | 23.25 | 07.30 | 5,12,19,26 | 3,10,17,24,31 | 7,14,21,28 | 13 |
1. गाडी क्रमांक 07189 नांदेड ते एर्नाकुलम (केरल) विशेष गाडी : - गाडी संख्या 07189 हुजूर साहिब नांदेड ते एर्नाकुलम ही विशेष गाडी नांदेड येथून दिनांक 4,11,18,25 नोवेंबर, 2,9,16,23,30 डिसेंबर-2022 आणि 6,13,20,27 जानेवारी-2023 ला शुक्रवारी दुपारी 15.00 वाजता सुटेल आणि निझामाबाद, सिकंदराबाद, गुंटूर, रेणीगुंठा (तिरुपती), इरोड, कोईम्बतोर, थ्रीशूर मार्गे केरळ राज्यातील एर्नाकुलम येथे शनिवारी रात्री 20.15 वाजता पोहोचेल.
2. गाडी क्रमांक 07190 एर्नाकुलम ते हुजूर साहिब नांदेड विशेष गाडी : गाडी संख्या 07190 हि विशेष गाडी एर्नाकुलम येथून दिनांक 5,12,19,26 नोवेंबर, 3,10,17,24,31 डिसेंबर-2022 आणि 7,14,21, 28 जानेवारी - 2023 ला शनिवारी रात्री 23.25 वाजता सुटेल आणि थ्रीशूर, कोईम्बतोर, इरोड, रेणीगुंठा, गुंटूर, सिकंदराबाद, निझामाबाद, मुदखेड मार्गे नांदेड येथे रविवारी सकाळी 07.30 वाजता पोहोचेल. या गाडीत स्लीपर, वातानुकुलीत आणि जनरल असे 18 डब्बे असतील.