मुखेड, रणजित जामखेडकर| मुखेड तालुक्यातिल वसंतनगर येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा आयोजित दोन दिवसीय कब्बडी सामन्यात माध्यमिक आश्रम शाळा कमळेवाडी च्या मुलाच्या संघाने आपल्या प्रतिस्पर्धी संघावर मात करत विजयी होऊन अजिंक्यपद पटकाविले तर सेवादास विद्यालय वसंतनगर येथील संघांनी आपल्या प्रतिस्पर्धी संघावर बाजी मारत द्वितीय क्रमांक मिळविला.
माध्यमिक आश्रम शाळा वसंतनगरच्या वत्तीने लोकनेते स्व.आमदार गोविंदराव राठोड यांच्या ८ व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त मंगळवार व बुधवार या दोन दिवशीय कब्बडी सामने आयोजित केले होते. पहिल्या दिवशी माजी आमदार कर्मवीर किशनराव राठोड यांच्या हस्ते कब्बडी सामन्यांचे उदघाटन करण्यात आले. हे सामने माध्यमिक व उच्चमाध्यमिक असे मुला - मुलींच्या संघात खेळवले गेले. यावेळी १९ संघांनी सहभाग घेतला होता.
या अटीतटीच्या सामन्यात पब्लिक स्कूल कमळेवाडीच्या उच्च माध्यमिक मुला - मुलींच्या गटाने प्रथम क्रमांक मिळवला. तर याच गटात द्वितीय क्रमांक उच्च माध्यमिक आश्रम शाळा वसंतनगर यांनी तर मुलींच्या संघात सेवादास उच्च मा.विद्यालयाने पटकावला. तर माध्यमिक गटातुन मुलांच्या संघामध्ये माध्यमिक आश्रम शाळा कमळेवाडी कंधार फाटा,तर द्वितीय सेवादास माध्यमिक विद्यालय वसंतनगर यांनी तर मुलींमध्ये माध्यमिक आश्रम शाळा वसंतनगर तर द्वितीय माध्यमिक आश्रम शाळा कमळेवाडी यांनी पटकावत खेळाडुंनी खेळातील कौशल्य दाखवून प्रेक्षकांची मने जिंकली.
तर बुधवारी विजेत्या संघास बक्षीस वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य दिलीप गायकवाड,तर प्रमुख पाहुने म्हणून प्राचार्य डाॅ.हरिदास राठोड, मुख्याध्यापक गोविंद पवार उप प्राचार्य मेघाजी गायकवाड, उपप्राचार्य शरद नाईक, उपमुख्याधिपिका प्रेमला स्वामी,मुख्याध्यापक संदिप गेटकेवार, क्रिडाविभागाचे प्रकाश पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी पंच म्हणून प्रा.सुभाष देठे, तालुका क्रिडा अधिकारी एन आर.पोटफोडे, डी.एन. गायकवाड,बाबु गंदपवाड,उत्तम हानमंते,संजय गायकवाड,मनोहर सुर्यवंशी यांनी कामगिरी केली.
माध्यमिक आश्रम शाळा कमळेवाडी च्या मुलांच्या संघाला आश्रम शाळेचे क्रीडा विभाग प्रमुख श्री उत्तमकुमार हनमंते व संदीप गुंटूरकर यांनी मार्गदर्शन केले होते . तर आश्रम शाळा कमळेवाडीच्या विद्यार्थिनींच्या संघाला आरती लिंगनवाड मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक रमेश डावकरे यांनी केले तर सुञसंचलन गजानन गेडेवाड,तर आभार राजकुमार यल्लावाड यांनी मानले.तर कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी माध्यमिक व उच्चमाध्यमिक आश्रम शाळेच्या कर्मचा-यांनी परिश्रम घेतला. विजय संघाचे सर्वत्र कौतुक होत असून खेळाडूंवर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.