उस्माननगर, माणिक भिसे। माझ्यावर दहिकळंबा वासियांनी दाखवलेल्या प्रेमाला मी केव्हाही विसरणार नसून शिराढोण सर्कलमधील व दहिकळंबा गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन लोहा कंधार विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय कर्तव्यदक्ष आ.मा. श्यामसुंदर शिंदे यांनी दहिकळंबा येथील विकास कामाचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळ्या प्रसंगी केले.
दहिकळंबा ता.कंधार येथे लोकप्रिय कर्तव्यदक्ष मा.आ.श्यामसुंदर पा.शिंदे ( कंधार ,लोहा विधानसभा मतदारसंघ) यांच्या स्थानिक विकास निधी अंतर्गत बस स्टॅण्ड ते हनुमान मंदिर नाली बांधकाम , गावाअंर्तगत महादेव मंदिर ते देवराव शिंदे यांच्या घरापर्यंत पेवरब्लाॅक, तसेच गावार्तंगत पेवरब्लाॅक यांच्यासह ३७ लक्ष रुपये विकास कामाचे भूमिपूजन व लोकार्पण नारळ फोडून व फलकांचे अनावरण आमदार श्यामसुंदर शिंदे व सौ.आशाताई शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शेतकरी कामगार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा तथा सामाजिक कार्यकर्त्या सौ.आशाताई श्यामसुंदर शिंदे या होत्या . याप्रसंगी गावाच्या वतीने उपसरपंच अवधूत पाटील शिंदे यांनी आमदार श्यामसुंदर शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना आ.श्यामसुंदर शिंदे म्हणाले की ,आगामी काळात होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीत पूर्ण तयारीनिशी व स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचे आवाहन केले.
मतदारसंघातील शिराढोण सर्कलमध्ये सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध आहे. मी विकासाच्या खोट्या गप्पा मारणाऱ्यापैकी नाही.मी काम करणारा कार्यकर्ता आहे.दहिकळंबा मधील नागरिकांनी मागील झालेल्या निवडणुकीतील राजकीय मतभेद बाजूला ठेवून गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी एकत्र येऊन गावचा विकास करावा.मी तुमच्या सोबत नेहमी आहे.असे मत व्यक्त केले.
यावेळी बालाजी ईसादकर यांनी लोकप्रिय आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या कार्याचा लेखाजोखा मांडला.केलेल्याकामाविषयी माहिती सांगितली.आमदार शिंदे साहेब हे या मतदारसंघाला टाॅपटेन मध्ये नेण्यासाठी प्रयत्न करीत आहेत असे सांगितले.सामाजिक कार्यकर्त्या सौ.आशाताई शिंदे यांनी आमदार साहेब विकास कामांसाठी कुठेच कमी पडणार नाहीत याची खात्री दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मारोतराव शिंदे यांनी गावातील मुलभूत सुविधाविषयी मागण्याचे वाचन मागणीव्दारे केले.यावेळी दहिकळंबा येथील उपसरपंच अवधूत पाटील शिंदे,राजू पाटील वडवळे ( मा.सरपंच कापशी ) सचिन कुदळकर , गंगाधर चिखलीकर, बालाजी ईसादकर ( सामाजिक कार्यकर्ते) शंकर राक्षसे ( मा.सरपंच दहिकळंबा ) चंपतराव शिंदे , व्यंकटराव शिंदे ,गणीसाब पठाण , दत्तात्रय शिंदे ,दिगांबर पाटील शिंदे, पांडुरंग पाटील शिंदे, रामकिशन पाटील, मारोतराव पाटील, किशनराव पाटील शिंदे , भगवान शिंदे , यांच्यासह कार्यकर्ते, नागरिक, महीला उपस्थित होते.