डॉ . विजय जंगम ( स्वामी ) , कार्याध्यक्षः अखिल वीरशैव लिंगायत महासंघ
मुंबई। दीर्घयुगे , दीर्घ कालखंड , उलटून तसेच दीर्घ युगांचे धक्के पचवूनही हिंदू धर्माची अस्मिता असलेल्या व आजही हिंदूंच्या मनामनात जिवंत असलेल्या गीता या ग्रंथाबद्दल वादग्रस्त वक्तव्य करताना भारताचे माजी गृहमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांनी गीतेमधून जिहाद ची शिकवण दिली जात असल्याचा जावई शोध लावला आहे . त्यांनी गीतेबाबत असे वक्तव्य केल्यानंतर सर्वत्र संतापाची लाट निर्माण झाली असून चाकूरकर यांच्या या वादग्रस्त वक्तव्यानंतर हिंदू धर्माचा वारसा सांगणाच्या लिंगायत समाजात संभ्रमाचे वातावरण निर्माण करण्याचा सुलतानी प्रयत्न केला आहे .
या प्रकरणी शिवराज पाटलांवर गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी करत , अखिल विरशैव लिंगायत महासंघाच्या वतीने त्यांचा तीव्र निषेध केला आहे . दिल्ली येथे मोहसीना किडवई यांच्या पुस्तकाचे प्रकाशन कार्यक्रमाप्रसंगी शिवराज पाटील चाकूरकर यांनी कुराण व बायबल सोबत गीता या हिंदू च्या धार्मिक ग्रंथ ची तुलना करताना श्रीकृष्णाने अर्जुनाला महाभारतातील लढाई प्रसंगी जिहादची शिकवण दिल्याचे सांगतानाच गीतेतून , जिहादची शिकवण दिली जात असल्याचा आरोप केला आहे.
यापूर्वी ही काँग्रेसच्या नेत्यांनी हिंदू धर्माला खलनायक ठरताना अशी वादग्रस्त विधाने केलेली आहेत . याचीच री ओढताना सहिष्णू हिंदू धर्माला परत एकदा कट्टरतेच्या पंगतीमध्ये बसवण्याचा प्रयत्न चाकूरकर यांनी केला आहे . भारतीय न्याय यंत्रणेमध्ये आजही विश्वासहर्तेचे दुसरे प्रतीक मानल्या गेलेल्या गीतेवर हात ठेवून खरे सांगण्याची शपथ घेतली जाते हिंदू धर्माची व भारतीयांची अस्मिता असलेल्या ग्रंथातून जिहादचे शिकवण दिले जाते असे म्हणणे म्हणजे हिंदूच्या व भारतीयांच्या अस्मितेलाच हात घालने आहे.
शिवराज पाटील चाकूरकर हे जरी लिंगायत असतील तरीही ज्या विचाराचा पगडा त्यांच्या मनामनात रुजलेला आहे त्याचेच प्रतीक म्हणजे हे वक्तव्य असल्याचा आरोप डॉ . विजय जंगम ( स्वामी ) यांनी केला आहे . शिवराज पाटील चाकूरकर हे लिंगायत समाजाचे जरी असले तरीही आजपर्यंत समाजासाठी त्यांनी काय केले ? हा प्रश्न असतानाच हिंदू धर्माबद्दल व कोट्यावधीची अस्मिता असलेल्या गीतेबद्दल अपशब्द वापरल्याने चाकूरकर हे हिंदू धर्मासाठी खलनायक ठरतात याच अनुषंगाने ते लिंगायत समाजासाठी ही खलनायक ठरत आहेत. या वृत्तीचा अखील वीरशैव लिंगायत महासंघाच्या वतीने तीव्र निषेध करण्यात येत आहे . या पत्रकार परिषदेत श्री प्रकाश जंगम , पद्माकर जंगम , सुभाष स्वामी हिंदू जमजागृती समितीचे श्री . बळवंत पाठक तसेच हिंदू टास्क फोर्सचे संस्थापक ड कुश खंडलवाल हे उपस्थित होते .