नांदेड। जिल्ह्यातील सांस्कृतिक वारसा हा महत्त्वाचा असून, या ठिकाणी अनेक लोकांनी सांस्कृतिक जपवणूक करण्यासाठी मेहनत घेतलेली आहे. हा वारसा टिकून राहण्यासाठी प्रत्येकानेच मेहनत व प्रयत्न करण्याची गरजेचे असे प्रतिपादन नांदेड जिल्ह्याचे नूतन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे
मो. रफी फॅन क्लब तर्फे सिनेसृष्टीतील प्रसिद्ध गायक कुमार सानू यांच्या वाढदिवसानिमित्ताने संगीत रजनीचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात ते बोलत होते. स्थानिक कलाकारांना या क्लब तर्फे संधी देण्यात येत आहे. हे पाहून अत्यंत आनंद झाला असून स्थानिक कलाकारांना वेगवेगळ्या ठिकाणी त्यांची कला सादर करण्यासाठी योग्य ती मदत करण्याचेही आश्वासन यावेळेस जिल्हाधिकारी अभिजीत जी राऊत यांनी दिले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी व्यापारी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष दिलीप कंदकुर्ते हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी उपनगराध्यक्ष किशोर भवरे पत्रकार कमलाकर बिरादार नगरसेवक भूषण सोनाळे यांची उपस्थिती होती या कार्यक्रमात कुमार सानू यांनी गायलेल्या काही निवडक गीतांना येथील गायक विजय निलंगेकर यांनी सादर केले एकूण 19 गाण्याची सादरीकरण त्यांच्यातर्फे करण्यात आले.
उपस्थित श्रोतेवर्ग मंत्रमुग्ध झाला होता त्यांच्यासोबत मो. रफी फॅन क्लबचे प्रमुख शेख इस्माईल सर यांनी निलंगेकर यांना बरसात के मौसम मे आणि रहने को घर नही या गाण्यांना साथ दिली तर मीना सोलापूर यांनी विजय निलंगेकर यांच्यासोबत इस प्यार से मेरी तरफ ना देखो, बाजीगर वो बाजीगर ,चोरी चोरी दिल तेरा चुराएंगे व तुम्ह अपना बनाने की कसम खाई है या गाण्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली निलंगेकर यांनी गायलेल्या चांद से पर्दा कीजिए, मेरा चांद आया मुझे नजर, ठेहरे हुए पानी में कंकर ना मार गोरी, या गाण्यांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच गा राहून फिल्म हे गीत गाऊन प्रेक्षकांचे मने जिंकले. या कार्यक्रमात ध्रुव कुमार सरदार व विजय बंदमवार यांनीही आपली गीते सादर केली. कार्यक्रमाचे सुरेख असे सूत्रसंचालन निवेदन कुमार सानू यांच्यासोबत कार्यक्रम केलेले प्रवीण पोतदार यांनी केले आपल्या निवेदनात त्यांनी विविध कलाकारांच्या आवाजात आपली अदाकारी सादर केली तीन तास चालल्या कार्यक्रमात उदंड असा प्रतिसाद प्रेक्षकांचा मिळाला.