मुंबई| प्रशांत अद्वैत फाऊंडेशनने मुंबईतील खार येथे तीन दिवसीय वेदांता महोत्सवाचे आयोजन केले होते. या फाउंडेशनची स्थापना प्रसिद्ध वेदांता शिक्षक आणि अत्यावश्यक मानवी स्वातंत्र्याचा पुरस्कार करणारे समाजसुधारक आचार्य प्रशांत यांनी केली होती.
१४ ते १६ ऑक्टोबर २०२२ दरम्यान आयोजित तीन दिवसांच्या मेळाव्यात आयआयटी व आयआयएमचे माजी विद्यार्थी आणि माजी नागरी सेवक आचार्य प्रशांत यांनी जीवनातील समस्यांवर चर्चा केली आणि संपूर्ण भारत व जगभरातून आलेल्या प्रेक्षकांच्या प्रश्नांची उत्तरे दिली.
वेदांता महोत्सव हा आचार्य प्रशांत यांच्याशी परंस्पर संभाषण करण्यासाठी एक मंच आहे आणि त्यात विज्ञान व अध्यात्म, आत्म-जागरूकता, उपनिषद, पर्यावरण आणि शाकाहार या विषयांवर सखोल व विचारपूर्वक चर्चा केली जाते. वेदांतावरील सखोल ज्ञान व प्रभुत्व यामुळे आचार्य-जी अत्यंत माहितीपूर्ण ज्ञान व कुशलतेसह विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देतात.
वेदांता महोत्सवचे व्यवस्थापक रोहित राजदान म्हणाले, "आमच्याकडे अधिक शहरांमध्ये महोत्सव आयोजित करण्याची विनंती करण्यात येत आहेत. यामधून तरूणांची प्रबळ संलग्नता दिसून येते, जेथे तरूणांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित पद्धतीने अध्यापन सखोलपणे व प्रामाणिकपणे दिले जाते.’’
आचार्य प्रशांत यांनी लिहिलेली शेकडो पुस्तके महोत्सवातील उपस्थितांना अर्पण करण्यात आली. गेल्या दहा वर्षांत मोठ्या शहरांपासून लहान शहरांपर्यंत शेकडो वेदांता महोत्सव आयोजित केले गेले आहेत, ज्याचा लाभ देश-विदेशातील लाखो साधकांना झाला आहे.