हिमायतनगर वाढोण्यात सोने लुटून आणि रावण दहनाने विजयदशमी साजरी -NNL


हिमायतनगर,अनिल मादसवार|
बजरंगदल शाखेच्या वतीने दि. ०५ नुध्वरी अहंकाररूपी रावणाच्या प्रतीकात्मक पुतळ्याच्या दहन करून, येथील श्री परमेश्वर मंदिराच्या वाढोणा नगरीत विजयदशमीचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. तर कालिंका मंदिरातून निघालेल्या मिरवणुकीतील नागरिकांनी सोने लुटून दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी जय श्रीराम.. भारत माता कि जय... वंदे मातरम... कालिंका माता कि जय... व्यंकटेश बालाजी कि जयच्या घोषणांनी परिसर दणाणून निघाला होता. 


शहरातील बालाजी मंदिरात गोविंद - गोविंदाच्या गजरात दर्शनासाठी नागरिकांची तोबा गर्दी झाली होती. यासह शहरातील ठिकठिकाणच्या मंदिरातही मोठ्या प्रमाणात महिला - पुरुषांनी दर्शनासाठी गर्दी केल्याचे चित्र दिसून आले. हिमायतनगर शहरातून दरवर्षीप्रमाणे पारंपारीक पध्दतीने सोने लुटण्यासाठी येथील कालिंका मंदिरापासून ढोल - तश्याच्या गजरात हाती मशाल घेऊन भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. यात गावातील प्रमुख लोकांनी सहभाग घेऊन सोने लुटले. त्यानंतर शहरातील सर्व देवी - देवतांचे दर्शन घेऊन ग्रामस्थांनी भेट घेवून एकमेंकांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी सर्वच मंदिरात दर्शनासाठी नागरिकांची मोठी गर्दी होती. 


त्यानंतर रात्री ९ वाजता हजारो जनसमुदायाच्या उपस्थितीत बजरंगदल शाखा हिमायतनगरच्या वतीने ५० फुट उंचीच्या रावणाचे दहन करण्यात आले. गेल्या १४ वर्षापासन हिमायतनगर बजरंग दल शाखेच्या वतीने रावण दहन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. यावेळी शहरातील हजारोच्या संख्येत हिंदू महिला - पुरुष व युवकांनी फटाक्याच्या अतिशबाजीत होणाऱ्या रावणाच्या दहनाचा सोहळा पाहण्यासाठी गर्दी केली होती. तत्पूर्वी अनेक मान्यवरांनी उपस्थितांना दसऱ्याच्या शुभेच्छा देऊन आपल्यातील अहंकारमय रावणाच्या वृत्तीचा त्याग करण्याचे आव्हानही केले. रावण दहनाच्या वेळी झालेल्या फटाक्यांची आतिषबाजी पाहून नागरिकांचे डोळे दिपून गेले होते.

दरम्यान रावण दहाची तयारी सुरु असताना सायंकाळी ५ वाजता हिमायतनगर शहर व तालुका परिसरात परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावली. यावेळी बजरंग दल  स्वयंसेवक युवकांनी मेहनत करून रावणाला भिजू न देता प्लास्टिक टाकून रात्रीला आयोजित रावण दहनाचा कार्यक्रम यशस्वी केला. या सर्वांचे आणि रावण दहनाच्या तयारीत रावण तयार करण्यासाठी बंजरग दल तालुका संयोजक गजानन चायल, माजी नगराध्यक्ष कुणाल राठोड, पत्रकार अनिल नाईक , जयराम शिंदे, लक्ष्मण डांगे, विपुल दंडेवाड, शुभम दंडेवाड,   राहुल नरवाडे, अक्षय सूर्यवंशी, बबलू डांगे, शिवम गाजेवार आदीसह सहकार्य कलेल्या सर्वांचे बजरंग दल संयोजक गजानन चायल यांनी आभार मानले. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी