अर्धापूर। तालुक्यातील लहान येथील जिल्हा परिषद प्रशालेच्या शालेय समितीची निवड करण्यासाठी सदस्यांची बैठक नुकतीच घेण्यात आली सदर बैठकीत समितीच्या अध्यक्षपदी माधव(बबन) संभाजी बोकसे तर उपाध्यक्षपदी संजय सोपानराव बुक्तरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
समितीच्या निवडणुकीसाठी दि.२७ रोजी वर्गनिहाय पालकांची बैठक घेवन सदस्य निवड करण्यात आले. या नवीन सदस्यांची विशेष बैठक मुख्याध्यापक एस.आर. जाधव यांच्या अध्यक्षतेखाली नुक्तिच घेण्यात आली सदर बैठकीत अध्यक्ष, उपाध्यक्षांची निवड करण्यात आली असून अध्यक्ष पदी माधव(बबन) संभाजी बोकसे तर उपाध्यक्ष पदी संजय सोपानराव बुक्तरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
कार्यकारिणी पुढीलप्रमाणे अध्यक्ष = माधव(बबन) संभाजी बोक्से, उपाध्यक्ष =संजय सोपानराव बुक्तरे, सचिव=एस.आर.जाधव (मुख्याध्यापक) सदस्य सौ.अर्चना सचिन सावंत, सौ. अरुणा सुनील रणखांब,सौ. मीना संतोष मोरे,सौ. संगीता प्रवीण पवार, विजय दिगंबर शेळके, दत्ता तुकाराम इंगळे ग्राम पंचायत सदस्य आनंद लोणे
उपसरपंच शेख महेबुब शेख रज्जाक तर दोन शिक्षण प्रेमी सदस्य बैठकीत निवड करण्यात येणार आहेत. शिक्षण क्षेत्रातील समितीच्या निवडणुकीसाठी राजकारण करायच नाही व होऊ द्यायचे नाही.येत्या काळात शौक्षणीक गुणवत्ता व प्रगती वाढ झाली पाहिजे या शुध्द हेतूने गावातील दोन्ही गटांनी एकत्र येऊन बिनविरोध निवड केली
यामध्ये काँग्रेसचे नेते संजय देशमुख लहानकर, माजी सरपंच सुधाकर इंगळे, माजी सरपंच एल.बी. रणखांब यांच्या सूचना नुसार व समतीने दत्तराव देशमुख पत्रकार सुभाष लोणे, सरपंच अमोल इंगळे,उपसरपंच शेक महेबुब,ग्रामपंचायत सदस्य आनंद लोणे, चेअरमन सतिश देशमुख लहानकर,सदाशिव इंगळे, शिवदास धारकर, छगन इंगळे, पृथ्वीराज गच्चे, दलीत वाहेव्वळ, प्रभाकर आंबेकर,यांचे सह ग्रामपंचायत सदस्य आदींनी पुढाकार घेतला. यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक, सदस्य यांचा ग्राम पंचायत पदाधिकारी, पालक,शिक्षण प्रेमीनी सत्कार करून अभिनंदन केले.