हदगाव| हदगाव तहसील अंतर्गत येणार्या स्वस्त धान्य दुकानातून पूर्वी आर्थिकदृष्ट्या गरीब, शेतकरी कुटुंबांना कमी पैशात धान्य मिळत होते. त्यात अचानकपणे बदल करून हदगाव तहसील कार्यालयाने शेतकरी कुटुंबाना राशनच बंद केले आहे. अगोदर राशन कार्डवर शेतकरी नाव का टाकण्यात आले? आता ते बंद का केले? आता नेमके काय झाले? उलट यावर्षी अतिवृष्टीमुळे तर शेतकरी कुटुंबे पूर्णतः उध्वस्त झाली आहेत. त्यांना राशनचा आधार आवश्यक आहे.
तसेच सर्व प्रकारचे राशन हे वेळेवर देण्यात यावे, त्यात खंड पडल्यास गोरगरीब लोकांचा उदरनिर्वाह कसा होईल? उदरनिर्वाहाचा प्रश्न न सुटल्यास ते रोजंदारीवर कामावर कसे जातील या बाबीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून त्यांचे धान्य मागील धान्यासह ताबडतोब देण्यात यावे. सर्वच प्रकारचे राशन विनाविलंब नागरिकांना देण्यात यावे. जेणे करून त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न सुटल्यास ते आपला रोजगार वेळेवर करून कुटुंबाचा गाडा व्यवस्थित चालवतील या बाबीचा विचार व्हायलाच पाहिजे. म्हणून आम आदमी पार्टी तालुका शाखा हदगाव च्या वतीने तहसीलदार हदगाव यांची भेट घेऊन त्यांना व्यवस्थित भूमिका समजावून सांगून निवेदन देण्यात आले.
राशनचा आणि गोरगरीब जनतेचा कसा जिव्हाळ्याचा आणि आत्मीयतेचा संबंध आहे आणि म्हणून राशन कसे आवश्यक व नियमित हवे आहे ही भूमिका तहसीलदारांना प्रत्यक्ष भेटून सादर करण्याचे काम हदगाव आप विधानसभा संयोजक प्रा. शिवाजी जोजार पाटील व तालुका सचिव ऍड. रविकुमार पाटील यांनी भूमिका मांडली आणि तहसीलदारांनी सविस्तर ऐकून घेऊन योग्य कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. यावेळी आप संयोजक नागोराव गंगासागर, कोषाध्यक्ष कैलास देशमुख, सहकोषाध्यक्ष माधवराव सुर्यवंशी, सहसचिव गिरीश गायकवाड पाटील, शेख यासीन, पंचायत समिती उमरी गण संयोजक डी.एस. वाठोरे व त्यांचे मित्रमंडळ उपस्थित होते.