तुकडोजी महाराज पुण्यतिथी निमित्य बाल सुसंस्कार शिबीर संपन्न -NNL


हिमायतनगर|
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५४ व्या पुण्यतिथी निमित्य दि.१७ आॅक्टोबर ते २३ आक्टोबर या कालावधीत तालुक्यातील व शहरातील विविध शाळेतील ९०  विद्यार्थ्यानि बाल संस्कार शिबीरात सहभाग घेतला होता. यात विद्यार्थांनी संरक्षणाचे प्रशिक्षण व बौद्धिक मार्गदर्शन घेतले.  


बाल संस्कार शिबीराची सुरुवात झाल्यानंतर वैराग्य मुर्ती चेतण्य महाराज कोंडदेव आश्रम कांडली, ह.भ.प ग्रामगीताचार्य सुनिल महाराज लांजूळकर, ह.भ.प किर्तनरत्न ज्ञानेश्वर महाराज केसाळे, ह.भ.प. गौपावराव महाराज मुळझरेकर यांनी सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. मुलांना बौद्धिक ज्ञाना बरोबर संस्कार रुपी ज्ञान देण्यात आले आहे. या शिबिरात सहभागी झालेल्या मुलांना सकाळी सामुदायिक ध्यान, योगासन व प्राणायम, बौद्धिक सञ, भजन संगीत, या बरोबर कृषी विषयक माहिती, पोलीस व सैन्य भरती, व्यापार खेळ, ओळख सुंदर जीवनाची आदीचे मार्गदर्शन लाभले. दि.२२ रोजी प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनी स्वसंरक्षणाचे प्रात्यक्षिक दाखवून उपस्थितांचे मने जिंकली. यावेळी महाविरचंद श्रीश्रीमाळ, अक्कलवाड सर, मुधोळकर आदींसह अनेक मनावर उपस्थित होते. शिबिराचा समारोप मुख्य रस्त्याने शोभा यात्रा काढून करण्यात आला.


सादर शिबीर यशस्वी करण्यासाठी विठ्ठलराव देशमवाड, गोविंद पाटील टेंभीकर, परमेश्वर इंगळे, परमेश्वर अक्कलवाड, संजय पाटील दुधडकर, प्रभाकरराव मुधोळकर, सेवानिवृत मुख्याध्यापक नागनाथ अक्कलवाड, चेअरमन गणेशराव शिंदे, आदीचे सहकार्य लाभले. सदर शिबीर पळसपूर रोडवर असलेल्या जतनबाई शेखावत शाळेच्या प्रांगणात संपन्न झाले. सात दिवसाच्या शिबिरात जवळपास  ९० विद्यार्थी सहभागी होते. या सर्वाना विविध मान्यवरांचा मार्गदर्शक इतर ३५ असे मिळून १२५ लोकांचा नास्ता व जेवनाचा खर्च प्रभाकरराव मुधोळकर, डाॅ. राजेद्र वानखेडे, डाॅ. लखपञे, संतोष गाजेवार, किशनराव अनगुलवार, संतोष अप्पा पळशीकर, नाथा पाटील कार्लेकर, प्रा. इंगळे, ओम ज्वलर्स आदीने उचलला असल्यामुळे हे शिबीर यशस्वी झाले आहे. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी