हिमायतनगर। आज दिनांक 17 ऑक्टोबर 2022 रोजी भारतीय जनता विद्यार्थी आघाडी चे जिल्हाध्यक्ष आदित्य पाटील शिरफुले यांनी अधीक्षक अभियंता महावितरण विभाग यांची भेट घेऊन हिमायतनगर तालुक्यातील महावितरण विज बिल ग्राहकांच्या बिल वरील पत्ता व पिनकोड दुरुस्त करून देणे बाबत मागणी केली.
हादगाव तालुक्यातून हिमायतनगर हा तालुका वेगळा होऊन वीस वर्षे उलटले असून ग्रामीण भागात वीजबिल ग्रहाक रहिवासी पुरावा म्हणून दाखवण्यासाठी लाईट बिल चा वापर केला जातो तालुक्यातील कामारी खैरगाव वटफळी व तसेच इतर अशी 13 गावे ही आष्टी फिडर जोडल्या गेले आहेत. त्यामुळे महावितरण चे जुने वीज ग्राहक यांच्या लाईट बिल वरील पत्ता व पिन कोड आजही हादगाव तालुक्याचा 431712 पिनकोड दाखवला जात आहे .त्यामुळे विद्यार्थी सर्व सामान्य नागरिकांना शाळा कॉलेज ऍडमिशन साठी तसेच युवकांना नोकरी डॉक्युमेंट वेरिफिकेशन तसेच शेतकऱ्यांना इतर सरकारी कामासाठी ऑनलाईन फॉर्म भरताना या चुकीच्या पत्त्यामुळे फार अडचण होत आहे.
तरी आपण यावर त्वरित लक्ष देऊन हिमायतनगर तालुक्यातील सर्व गावातील लाईट बिल वरचा पत्ता दुरुस्त करून देऊन सर्व विद्यार्थी व नागरिकांना येणाऱ्या अडचणी पासून मुक्तता करावी ही विनंती आदित्य पाटील यांनी केली असून, त्यावर अधीक्षक अभियंता आणि त्वरित दाखल घेऊन कार्यकारी अभियंता यांना एक महिन्याच्या विज वीज ग्राहकांच्या बिलावरील दुरुस्ती करावी अशा सूचना दिल्या आहेत.