नविन नांदेड। राष्ट्रवादी कॉंग्रेस सेवादलाच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी (ग्रामीण) पक्षाचे जिल्हा संघटक (ग्रामीण) रमेश शंकरराव गांजापूरकर यांची निवड करण्यात आली आहे, या निवडीबद्दल मित्र मंडळ व पदाधिकारी यांनी अभिनंदन केले आहे.
ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री कमलकिशोर कदम, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर यांच्या शिफारसीवरुन ही निवड प्रदेश अध्यक्ष डॉ.जानबराव मस्के यांनी केली आहे. रमेश शंकरराव गांजापूरकर हे अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात जिल्हा संघटक (ग्रामीण) या पदावर कार्यरत असून त्यांनी अनेक सामाजिक कार्य केली आहेत. रमेश गांजापूरकर हे अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारक महासंघ, पुणे या संघटनेच्या माध्यमातून रास्त भाव दुकानदारांची अनेक प्रश्न त्यांनी सोडविले असून अनेक गरजु व गोरगरीबांना त्यांनी या माध्यमातून सहकार्य केले आहे.
सर्व सामन्यातील दांडगा जनसंपर्क आणि माणसे जोडण्याची कला, यामुळे त्यांची राष्ट्रवादी कॉंग्रेस सेवादलाच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. सेवादलाचे प्रदेश अध्यक्ष डॉ. जानबा मस्के तसेच कार्याध्यक्ष राजेंद्र लावंघरे (देशमुख) यांनी रमेश गांजापूरकर यांना नियुक्तीचे पत्र दिले आहे. या नियुक्तीबद्दल कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले आहे.