बसव ब्रिगेडच्या वतीने दत्ताभाऊ शेंबाळे यांचा सत्कार -NNL


नांदेड|
भाजपा किसान मोर्चा प्रदेश कार्यकारणी सदस्य पदी दत्ताभाऊ शेंबाळे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. नुकताच पुण्यात झालेल्या एका कार्यक्रमात पुणे जिल्हा परिषद चे माजी अद्यक्ष प्रवीण दादा कंद यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये ,किसान मोर्च्या चे प्रदेश आद्यक्ष वासुदेव काळे यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.या निवडी बद्दल भाजपा प्रदेश प्रवक्ते एकनाथ दादा पवार,किसान मोर्च्या प्रदेश सरचिटणीस सुधाकर भोईर,बसव ब्रिगेड संस्थापक अद्यक्ष ऍड.अविनाश भोसीकर, माजी,आमदार राजेंद्र नजरधने,भाजपा नेते रामदास पाटील यांनी त्यांचे अभिनंदन केले.

दत्ता भाऊ हे नेहमीच लिंगायत समाजातील वेगवेगळ्या आंदोलनात सक्रिय स्वरूपात सहभाग घेतात .तसेच समाजातील समस्येबद्दल त्यांना चांगला अभ्यास असल्यामुळे त्यांची लिंगायत समाजात एक समाजशील नेता म्हणून ओळख आहे. दत्ताभाऊ शेंबाळे यांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून अनेक वंचित पीडित घटकावर सुद्धा आसूड ओढून त्यांना न्याय दिल्याचे दिसते. अनेकांना त्यांनी न्याय मिळवून दिला. त्यांचा अभ्यासाचा विषय जरी शेतकरी असला तरी इतर कुठल्याही सामाजिक प्रश्नात ते सक्रिय दिसतात. नांदेड जिल्ह्यात त्यांना एक अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणून समाजासोबत इतर पीडित घटकांचा नेहमीच पाठिंबा राहिलेला आहे.

याच कार्याची दखल घेऊन भारतीय जनता पार्टीने त्यांना भाजपा किसान मोर्चा प्रदेश कार्यकारणी मध्ये स्थान देऊन लिंगायत समाजातील एका सर्वसामान्य व्यक्तिमत्त्वाचा सन्मान केला .अशी भावना समाजात निर्माण झालेली आहे त्या निमित्ताने समाजातील युवकांचे संघटन असलेली लिंगायत युवा मंच म्हणजेच बसव ब्रिगेडच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला त्याप्रसंगी प्राध्यापक आनंद कर्णे, बाबूरावआप्पा स्वामी, रत्नाकर  कुऱ्हाडे, पिंटू बोंबले, राजू  बोंबले ,सुरज शेट्टे यासह इतरही अनेक जण उपस्थित होते.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी