सरदार वल्लभ भाई पटेल यांची जयंती उत्साहात साजरी -NNL

खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या हस्ते एकता दौडचा शुभारंभ


नांदेड|
सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या जयंती निमित्त आज खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध उपक्रम घेण्यात आले. जिल्हा प्रशासनातर्फे आयोजित करण्यात आलेल्या एकता रॅलीचा शुभारंभ खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी हिरवी झेंडी दाखवून केला. 

यावेळी महापौर जयश्री पावडे, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी, अप्पर पोलीस अधिक्षक निलेश मोरे, उपजिल्हाधिकारी दिपाली मोतियाळे, अनुराधा ढालकरी, संतोषी देवकुळे, जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिका रेखा काळम-पाटील, प्रविण साले आदींची उपस्थिती होती.


जिल्हाधिकारी कार्यालयापासून सुरु झालेली रॅली जुना मोंढयातील टॉवर येथील सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या पुतळयापर्यत आयोजित करण्यात आली होती. रॅलीच्या निमित्ताने महात्मा गांधी यांच्या पुतळयास आणि सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी उपस्थितांना भ्रष्टाचार निर्मुलन व राष्ट्रीय एकात्मतेची शपथ दिली.  

मान्यवरांच्या हस्ते सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या जीवन कार्याची माहिती देणाऱ्या प्रदर्शनीचे उद्घाटन जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन भवन येथे करण्यात आले. याचबरोबर  सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या जीवनावर आधारित चित्रफितीचे अवलोकन करण्यात आले. या कार्यक्रमाचे सुत्र संचालन व आभार प्रलोभ कुलकर्णी यांनी मानले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी