नवीन नांदेड। दृष्ट प्रवृत्तीच्ये दहन करून विकासाला नागरीकांनी साथ द्यावी, लोकसभा निवडणुकीत मध्ये जो निर्णय नागरीकांनी घेतला तोच निर्णय नांदेड वाघाळा शहर महापालिका मध्ये नागरीकांनी घ्यावा असे आवाहन खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी भाजपा मंडळ सिडको आयोजित रावण दहन प्रसंगी केले.
विजया दशमी दसरा निमित्ताने भारतीय जनता पार्टी सिडको मंडळाच्या वतीने दि.५ऑक्टोबर रोजी उस्मानगर रोडवरील वाघाळा पाटीजवळील मोकळ्या मैदानात रावण दहण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, असून या सोहळ्याला नांदेड जिल्हायांचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या सह मान्यवरांच्या उपस्थितीती होती, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संयोजक भाजपा सिडको मंडळ अध्यक्ष वैजनाथ देशमुख यांनी केले.
भाजपा मध्ये येणाऱ्या कार्यकर्ते व नेते मंडळी यांच्यी येणारी संख्या वाढली असून नाव न घेता उल्लेख करून स्वागत असल्याचे सांगून निवडणूक मध्ये त्यांचे सहकार्य होईल व महापालिका मध्ये भाजपाला निवडणू द्या व विकासात्मक कामाला प्राधान्य देण्यात येईल असे सांगितल, मनपा निवडणुकीत भाजपा उमेदवाराला निवडून द्यावे असे आवाहन ऊपसिथीत नागरीकांना केले खा. चिखलीकर यांनी केले.
भाजपा सिडको मंडळ आयोजित रावण दहण हिंगोली येथील कारागिरांनी केलेल्या ५२ फुटी असलेल्या दहातोंडी रावणाचे दहन खा.चिखलीकर व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले, या वेळी ढोल ताशाचा गजरात व फटाक्यांच्या मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले, या सोहळ्याला माजी आमदार सुभाष साबणे,भाजपा जिल्हाध्यक्ष प्रविण साले,भाजयुमो महानगर जिल्हाध्यक्ष संजय पाटील घोगरे,युवा नेते ,जिल्हा परिषद सदस्य प्रविण पाटील चिखलीकर, जिल्हा परिषद सदस्या प्रणिताताई देवरे,भाजपा प्रदेश सदस्य दिलीप कंदकुर्ते,माजी सभापती आनंदराव पाटील ढाकणीकर,जनार्धन ठाकुर, दिलीप ठाकूर,अनिल हजारी, माजी नगरसेवक राजू गोरे,नगरसेविका बेबीताई गुपिले, नरेंद्र गायकवाड,माधव देवसरकर, बिपीन गादेवार, संजय अंभोरे, विजयाताई गोडघासे,संतोष वर्मा, जनार्धन गुपीले,आंंनद दासरवार, यांच्या सह मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी प्रविण साले यांनी अंहकार रूपी रावणाचे दहन केले जात असल्याचे सांगितले,तर प्रणिताताई देवरे,दिलीप कंदकुर्ते यांच्ये मार्गदर्शन पर भाषणे झाली. या सोहळ्याला भाजपाचे पदाधिकारी विठ्ठल घाटे, विशाल गडंबे, राजेंद्र जुझारे, कल्याण यजगे, सुनिल पाष्टेकर, पराग श्रोते,महेंद्र तरटे यासह मान्यवरांच्यी उपस्थितीती होती.
या कार्यक्रमाचे आयोजन भाजपा सिडको मंडळ अध्यक्ष वैजनाथ देशमुख यांच्या नेतृत्वाखाली भुजंग मोरे, प्रमोद रेवणवार, प्रभाकर जाधव, दत्ता वरपडे, आनंद दासरवार, महेश वल्लावार, मोनू जोशी, शिवा निलावार, नारायण वडवळे, बंडू जोशी, निलेश पेन्शलवार आदि परिश्रम घेतले, सुत्रसंचलन दिंगा पाटील,व धिरज स्वामी यांनी केले,या सोहळ्याला सिडको हडको परिसरासह ग्रामीण भागातील नागरीक महिला,युवक व प्रतिष्ठित नागरिक यांच्या सह हजारो नागरिक यांच्यी मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सुरेश थोरात, उपनिरीक्षक महेश कोरे, बालाजी नरवटे यांच्या सह पोलीस अंमलदार, होमगार्ड यांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.