हडको भागात सिडको भाजपाच्या वतीने रावण दहन...
नवीन नांदेड। हडको व सिडको येथील बालाजी मंदिर देवस्थान दसरा ब्रह्मोत्सवा निमित्य दि. 26 सप्टेंबर ते 5 ऑक्टोंबर दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रम सह प्रांरभी गरूड ध्वजारोहण व यासह रोषणाई ,सजावट , करण्यात आली होते. नवरात्र महोत्सव दरम्यान हजारो भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने दर्शन घेतले तर भाजपा मंडळ सिडको अध्यक्ष वैजनाथ देशमुख यांच्या वतीने ५२ फुट उंचीच्या रावणाचे दहन खा.चिखलीकर यांच्या हस्ते करण्यात आले.
बालाजी मंदिर देवस्थान हडको येथे २० व्या ब्रह्मोत्सवा निमित्य सतीश गुरु पोतदार ,विनय गुरु परळीकर,इंद्रमनी दुबे ,प्रकाश महाराज यांच्या पौरहित्याखाली दि २६ सप्टेंबर ते५ ऑक्टोंबर दरम्यान व सकाळी अभिषेक आरती ,बालभोग कलश स्थापना होम हवन ,कुंकुम आर्चन , विष्णुसहस्त्र नाम ,देवता विसर्जनपूर्ण आहुती बलिप्रदान, होम हवन व कल्याण उत्सवाचे मुख्य यजमान संतोष जोशी हे या वर्षी नवीन बांधकाम केलेल्या कल्याण मंडपात होम हवन चे आयोजन करण्यात आले होते.ब्रम्होत्त्सव निमित्ताने शिवानंद निलावार यांच्या कडून दररोज प्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे, ब्रम्होत्त्सव निमित्ताने आयोजित विविध कार्यक्रमाला २६ सप्टेंबर ४ आकटोबर पर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, कल्याण उत्सव, भगवान बालाजी मंदिर मुर्ती मिरवणूक कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते.
मंदिर परिसरात रोषणाई, फुलाजी सजावट यासह धार्मिक कार्यक्रम चे आयोजन करण्यात आले होते ,दसरा ब्रह्मोत्सवा निमित्य आयोजित विविध कार्यक्रम यशस्वीतेसाठी संस्थापक अध्यक्ष माणिकराव देशमुख,विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष अरुण दमकोडंवार,उपाध्यक्ष विवेकानंद देशमुख,सचिव बाबुराव येरगेवार ,कोषाध्यक्ष करणसिंग ठाकूर सहसचिव प्रकाशसिंह परदेशी,संतोष वर्मा, बाळासाहेब मोरे,अजय भंडारी ,गोवर्धन बियाणी , सचिन नपाते ,संजिवन राजे चंद्रशेखर चव्हाण, सुभाष कारंजकर ,किशोर देशमुख यांनी केले आहे.नवरात्र उत्साह निमित्ताने हडको येथील बालाजी मंदिर देवस्थान येथे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार मोहनराव हंबर्डे, नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेचा महापौर जयश्री ताई पावडे यांच्या सह लोक प्रतिनिधी, विविध क्षेत्रातील मान्यवरांनी दर्शन घेतले.
सिडको भगवान बालाजी मंदिर देवस्थान येथे ब्रम्होत्त्सवाला आज २६ सप्टेंबर ४ आकटोबर पर्यंत करण्यात आले होते, आचार्य पंडित वटीकोटा रामानुजाचार्य व दिव्याशु महाराज यांच्या आचार्य तत्वाने सुरूवात केली होती, मंदिर सजावटीसह परिसरात व मंदिरावर रोषणाई करण्यात आली होती, रथ उत्सव,कल्याण उत्सवसह, भगवान बालाजी पालखी मिरवणूक ला भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रतिसाद दिला, मंदिराचे विश्वस्त अध्यक्ष साहेबराव जाधव, उपाध्यक्ष बाबुराव बिरादार,सचिव व्यंकटराव हाडोळे, डॉ.नरेश रायेवार,आंंनद बासटवार, वैजनाथ मोरलवार, रामचंद्र कोटलवार, पुरूषोत्तम लाठकर, गोविंद सुनकेवांर, पुंडलिक बिरादार व उत्सव समिती परिश्रम घेतले,या वेळी हजारो भाविक भक्तांनी दर्शन घेतले.
नवरात्र महोत्सव निमित्ताने व ब्रम्होत्त्सव विजया दशमी दसरा निमित्ताने भाविक भक्तांनी मोठ्या प्रमाणात मंदीरात गर्दी केली होती.या वेळी विश्वस्त मंडळाच्या वतीने आलेल्या भाविकांना प्रसाद वाटप करण्यात आले. भाजपा मंडळ सिडकोचा वतीने हडको परिसरातील प्रांगन येथे आयोजित आयोजक वैजनाथ देशमुख यांनी ५२ फुट उंचीच्या रावणाचे दहन खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते करण्यात आले.