काँग्रेस पक्षाने संधी दिल्यास जनतेतून नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढविणार - गणेशराव शिंदे -NNL

एक नवा चेहरा आणि विकासाभिमुख नेतृत्व शहराच्या विकासाला चालना देण्यासाठी मिळेल..!


हिमायतनगर, अनिल मादसवार|
काँग्रेस पक्षाने आपणास नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी दिल्यास सर्व ताकद पणाला लावून संधीचे सोने करून शहरच कायापालट करण्यासाठी रात्रंदिवस मेहनत करू अशी प्रतिक्रिया नांदेड जिल्हा मध्यवर्ती बैंकेचे संचालक गणेशराव शिंदे यांनी नांदेड न्यूज लाईव्हशी बोलताना दिली आहे. जेव्हापासून काँग्रेस पक्षाचे काम सुरु केले, तेंव्हापासून इमाने इतबारे पक्षाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत असल्याचेही शिंदे यांनी सांगितले आहे. जर शिंदे याना पक्षाने संधी दिली तर एक नवा चेहरा आणि विकासाभिमुख नेतृत्व शहराच्या विकासाला चालना देण्यासाठी सक्षम नेतृत्व मिळेल असे बोलले जात आहे. 

महाराष्ट्रात सत्ता बदल झाल्यानंतर शिंदे - फडणवीस सरकारने थेट जनतेतून नगराध्यक्ष निवड होणार असल्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अनेकांना नगराध्यक्ष पदाचे डोहाळे लागले असून, गेल्या अनेक वर्षापासून सत्तेत असलेला काँग्रेस पक्ष यावेळी पहिल्या अडीच वर्षाच्या टर्मसाठी हिंदूंचा नगराध्यक्ष निवडून आणण्याच्या बेतात असल्याचे बोलले जात आहे. कारण पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीत मुस्लिम समाज बांधवास नगरध्यक्षपदाच्या खुर्चीवर बसविण्यात आले होते. त्यानंतरच्या अडीच वर्षाच्या काळात हिंदूंचा नगराध्यक्ष करण्याच्या प्रथेला फाटा दिल्या गेल्याने काँग्रेस पक्षात फूट पडून हिमायतनगर येथील नगरपंचायतीवर अवघे ४ उमेदवार असताना शिवसेनेने राजकीय खेळी करून आपला नगराध्यक्ष केला होता. त्यामुळे पुन्हा नगरपंचायतीची सत्ता आपल्या हातात राहावी यासाठी काँग्रेस पूर्ण तयारीनिशी निवडणुकीत उमेदवार उभे करणार आहे. त्यातच जनतेतून नगराध्यक्ष होणार असल्याने अनेकजण इच्छुक असताना आता गणेशराव शिंदे यांनी नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढविण्याची तयारी दर्शविल्याने हिंदूंचा नगराध्यक्ष करण्यासाठी हा चांगला पर्याय असल्याचे जनतेतून बोलले जात आहे.  

यावेळी गणेशराव शिंदे म्हणाले कि, गेली अनेक टर्ममध्ये नांदेड जिल्हा मध्यवर्ती बैंकेच्या संचालक पदावर विराजमान आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांच्या अडीअडचणी सोडविल्या आहेत. विविध पदावर काम केले असून, पदावर असताना सर्वसामान्याना न्याय देणे हा धर्म मी इमाने इतबारे पळाला आहे. आता जर पक्षाने संधी दिल्यास शहरातील प्रमुख नागरी समस्या, आरोग्याच्या दृष्टितीने शहर नालीमुक्त करून ड्रेनेज लाईन उभारणे, शहर अतिक्रमणमुक्त करून रस्ते मोकळे करणे, मोकाट जनावरांचा प्रश्न, सार्वजनिक समस्या नवीन वस्तीत रस्ते, लाईटसह प्रत्येक नागरिकांच्या आवश्यक समस्या माझ्या समजून काम करणार आणि पदाचा मान राखत संधीचे सोने करून दखविणार असल्याचे त्यांनी सांगितले.    

आज गणेशराव शिंदे यांनी नांदेड न्यूज लाईव्हशी खास बातचीत करून नगराध्यक्षपदासाठी निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असल्याची भावना बोलून दाखविले आहे. पक्षश्रेष्टींने संधी दिल्यास जनतेतून नगराध्यक्षपदाची निवडणूक लढविणार आणि मिळालेल्या संधीचे सोने करणार अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून पहिल्या अडीच वर्षाच्या काळात हिंदूंचा नगराध्यक्ष व्हावा यासाठी गणेशराव शिंदे हे एक रोखठोक व चांगला पर्याय असल्याचे बोलले जात आहेत. निवडणूक लागण्यास आणखी काही महिन्याचा अवधी आहे, त्यामुळे जनतेतून नगराध्यक्ष या पदासाठी अनेकजण रिंगणात उतरतील अशी तयारी सर्वच पक्षाकडून सुरु असल्याचे दिसते आहे. त्यातही विविध पक्षात इच्छुक जास्त आणि जनतेच्या मनात असलेले उमेदवार कमी आहेत. त्यातही विकासाची दूरदृष्टी असणारी व्यक्ती या पदावर बसली तर ठीक अन्यथा गाव आणि शहराच्या विकासाचा पुरता खेळखंडोबा होण्यास वेळ लागणार नाही. कारण मागील पंचवार्षिक काळात कोट्यवधींच्या निधीतून विकास कामे झाली मात्र ती सर्व बोगस पद्धतीने करण्यात आल्याने शहरातल्या जनता आता उच्चशिक्षित आणि विकासाची दूरदृष्टी ठेवणाऱ्या व्यक्तीला निवडून देतील असे चित्र आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी