पिंपळदरी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सौ. यमूनाबाई शिवाजी जाधव यांची बिनविरोध निवड - NNL


उस्माननगर।
लोहा तालुक्यातील मौजे पिंपळदरी ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी सौ़. यमूनाबाई शिवाजी जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. पिंपळदरी ता. लोहा येथील ग्रामपंचायत ही सात  (७ ) सदस्याची असुन यातील दोन सदस्याचे पद काही कारणास्तव रिक्त आहेत. निवडून आलेल्या पाच सदस्यामध्येच दि. १२ऑक्टोबर रोजी  उपसरपंचाची निवड प्रक्रिया घेऊन ही  निवड झाली.

सदरील निवडणूक ही फेब्रुवारी २०२१ मध्ये पार पडली होती. सरपंच म्हणून सौ.चंद्रकालाबाई बाबाराव जाधव तर उपसरपंच म्हणून सौ. पार्वतीबाई कटवड यांची निवड करण्यात आली होती. काही कारणास्तव पार्वतीबाई कटवड यांना उपसरपंच पदावरून पायउतार व्हावे लागले. त्यामुळे पिंपळदरी ग्रामपंचायत येथील उपसरपंच पद रिक्त होते. नुकतेच निवडणूक निर्वाचन आधिकारी यांनी उपसरपंच पदासाठीचा कार्यक्रम आखण्यात आला होता. 

त्या ठिकाणीं सौ.यमुनाबाई जाधव यांनी  उपसरपंच पदासाठीचा  उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. त्यांच्या विरुद्ध  एकही अर्ज दाखल  झाला  नसल्यामुळे त्यांची उपसरपंच म्हणून निवड  करण्यात आली आहे. संतोष पाटील यांच्या वतीने उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी सौ.चंद्रकला बाबाराव जाधव, सौ.यमूनाबाई शिवाजी जाधव (उपसरपंच},सौ.सुमनबाई पांडुरंग कांबळे,सौ.कल्पना निरंजन पांचाळ, श्री.तुकाराम मारोती जाधव , सरपंच श्री.संतोष देवराव पाटील जाधव पिंपळदरीकर तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.नवनियुक्त उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांचा संतोष पाटील यांनी सत्कार करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या . यावेळी निर्वाचन अधिकारी म्हणून  एस.बी.चोरमले ( कक्ष आधिकारी पं.स.लोहा ) ग्रामसेवक श्री. पुंड ,  यांच्यासह अनेक मान्यवर, वरिष्ट अधिकारी  उपस्थित होते.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी