नांदेड। डॉ शंकरराव चव्हाण शासकिय वेदकीय महाविद्यालयं मध्ये औषध वेद्यक शास्त्र विभाग अंतर्गत वृध्द लोकांसाठी खास असे Geriatric OPD वृद्ध औषध वेदकीयशास्त्र बाह्यरुग्ण ओपीडीचे उद्घाटन अधिष्ठाता डॉ पी टी जमदाडे यांचे द्वारे करण्यात आले
त्यांनी या सुविधा चे लाभ समाजातील वृध्द व्यक्ती नी घ्व्या असे आवाहन केले तर औषधवेद्यक शास्त्र विभाग प्रमुख डॉ डी पी भुरके यांनी येत्या काळात माननीय संचालक डॉ म्हैसेकर व माननीय अधिष्ठाता डॉ जमदाडे यांचे मार्गदर्शनात स्वत्रंत Geriatric विभाग सुरु करणे साठी पर्यत्न करणार असे प्रतिपादन केले .
जेरियाट्रिक मेडिसिन, ही एक वैद्यकीय संज्ञा आहे जी वृद्ध प्रौढांच्या आरोग्य गरजा पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित करते. वृद्ध प्रौढांमधील रोग प्रतिबंध , निदान आणि उपचार करून आरोग्यास प्रोत्साहन देणे हे त्याचे उद्दिष्ट आहे.
सूत्र संचालन सहयोगी प्राध्यापक व पथक प्रमुख डॉ शितल राठोड यांनी तर आभार प्रदर्शन डॉ प्रशांत गजभारे यांनी केले .या प्रसंगी रुग्णालय अधिक्षक डॉ प्रदीप बोडके, औषधवेद्यक शास्त्र विभाग प्रमुख डॉ डी पी भुरके जिवरासायान शास्त्र प्रमुख डॉ इशरत करीम ,श्वसन विकार शास्त्र प्रमुख डॉ विजय कापसे , औषधवेद्यक शास्त्र चे सहयोगी प्राध्यापक डॉ कपिल मोरे , शितल राठोड , डॉ ओबेद खान व सहायक प्राध्यापक डॉ प्रशांत गजभारे , डॉ संजीव झांगडे, डॉ. धम्मदीप कदम , डॉ ज्ञानेश्वर धेपाले व कनिष्क निवासी डॉ. यश अगरवाल, डॉ ऐश्वर्या , डॉ अनिश उपस्थित होते .