लोहा| तालुक्यातील पात्र लाभार्त्यांनी पीएम -किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी त्याच्या बँक बचत खात्याला आधार लिंक करणे अनिवार्य आहे. ७ सप्टेंबर ही शेवटची तारीख असून इ-केवायसी 'कारणाऱ्यांनाचा या योजनेचा लाभ मिळेल अन्यथा त्या पात्र शेतकऱ्यांना या योजनेचे अनुदान मिळणार नाही. तेव्हा तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांनी आधार लिंक केले नाही त्यांनी करून घ्यावे असे आवाहन लोहा तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांनी केले आहे.
पीएम किसान योजनेतील पात्र लाभार्त्याना वर्षा काठी सहा हजार रूपये मिळतात.चार महिन्याला प्रत्येकी दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात. पण त्यासाठी इ -केवायसी असणे गरजेचे आहे. लोहा तालुक्यातील १४हजार ६३७ पात्र शेतकऱ्यांनी अध्यापही त्याच्या बँक खात्याला आधार लिंक केलेली नाही.मध्यंतरी महसूल विभाग व कृषी विभाग यांच्यात पीएम -किसान योजनेची कोणी करायची या वरून वाद होता. त्यामुळे पात्र लाभार्त्यांना पीएम -किसान योजनेचा लाभ मिळाला नाही. पण आता ७ सप्टेंबर पर्यंत उपरोक्त लाभार्त्यांनी त्यांच्या बँक खात्याला आधार लिंक अर्थात ई-केवायसी करून घ्यावी अन्यथा या लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
मोबाईल वरही हे लिंकीग करता येते तसेच सीएससी केंद्रावर जाऊन पात्र शेतकऱ्यांनी पीएम -किसान योजनेसाठी आधार लिंक करावे. याची लिंकिंक मुदत ७ सप्टेंबर पर्यंत आहे. ई केवायसी नसेल तर अनुदान मिळणार नाही. तेव्हा ज्या लाभार्थ्यांचे बँक खात्याला आधार लिंक नाही. त्यांनी तात्काळ करून घ्यावे असे आवाहन तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांनी केले आहे.