कोणीही अश्या प्रकारे खोटी माहिती देऊन दिशाभूल करू नये - पोलीस निरीक्षक बि,डी. भुसनूर
नांदेड/हिमायतनगर, अनिल मादसवार| नागरिकांनी सावधान राहणे गरजेचे आहे. आपण डायल ११२ वर कॉल करून खोटी माहिती दिल्यास तुम्हाला महागात पडू शकते. नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर शहरातील एका व्यक्तीने ११२ वर कॉल करून खोटी माहिती दिली. ही खोटी माहिती देणे त्याला चांगलेच महागात पडले असुन, पोलिसांची दिशाभूल केल्याप्रकरणी हिमायतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हिमायतनगर शहरातील जनता कॉलनी भागात राहणाऱ्या एका व्यक्तीने दि ३१ बुधवारी रात्री ८-३० वाजेच्या सुमारास पोलीस विभागाचे ११२ नंबरवर फोन करून दारू बंदी करा. शहरात दारूची चोरटी विक्री चालू आहे असे सांगून कार्यवाही करण्याची मागणी केली. फोन येताच पोलीस पथक तातडीने फोन आलेल्या ठिकाणी गेले असता त्या ठिकाणी असला कोणत्याही प्रकार घडत असल्याचं आढळून आला नाही. याबाबत पोलिसांना खोटी माहिती देल्याचे निष्पन्न झाले. यावरून पोलीस ठाण्यात खोटी माहिती देऊन दिशाभूल केल्या प्रकरणी त्या युवकास ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणण्यात आले.
त्यानंतर नामदेव तुकाराम पोटे, पोलीस जामदार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कलम १८२ भादवी प्रमाणे खोटा फोन करणारा शेख अतिफ शे बाबू वय २५ वर्ष रा जनता कॉलनी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या युवकास हे प्रकरण चांगलेच भोवले असून, घटनेचा तपास पोलीस निरीक्षक बीडी भुसनुर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस जामदार अशोक सिंगणवाड हे करत आहेत.
महाराष्ट्र पोलिसांनी कुणावर अन्याय, अत्याचार, चोरी, मारहाण आणि गुन्हेगारीवर या यावर त्वरीत आळा बसवण्यासाठी व पोलीस लवकरात लवकर घटनास्थळी पोहचली पाहिजे. याकरिता डायल ११२ प्रणाली सुरू केली आहे. मात्र त्याही प्रणालीचा दुरूपयोग करून कॉल करीत खोटी माहिती देत पोलिसांची दिशाभूल केली आहे. डायल ११२ ही प्रणाली नागरिकांच्या सोयीसाठी केलेली असताना त्याचा दुरुपयोग अशाप्रकार करणे चुकीचे असून, असे वर्तन कुणीही करू नये असे आवाहन पोलीस निरीक्षक बी डी भुसनूर यांनी केले आहे. असे केल्यास गुन्हा तर दाखल होईल वेळप्रसंगी तुरुंगात जावे लागणार आहे.
११२ प्रणालीवर मदतीसाठी कॉल केल्यास हा कॉल थेट मुंबई, नागपूर, त्यानंतर नांदेड एसपी ऑफिस व त्यानंतर संबंधित पोलीस ठाण्यास तातडीने कार्यवाही संदर्भात माहिती मिळते. कॉल करणाऱ्याची डिटेल्स माहिती आधारसह नंबर संबंधित यंत्रणेला जाते. तेंव्हा पोलिसांना घटनास्थळी जाऊन त्या संदर्भांव्ये तपस करणे बंधनकारक असते. यातही असे खोटे कॉल आल्यान पोलीस यंत्रणेची दिशाभूल होऊन वेळ वाया गेल्यामुळे शासकीय कामात अडथळा निर्माण होतो आहे.