बोधडी येथील अंध विद्यालयाच्या संगीत केंद्राला आदर्श केंद्र पुरस्कार -NNL


किनवट/नांदेड|
अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने किनवट तालुक्यातील बोधडी येथील अंध विद्यालयात अनेक वर्षापासून उत्तम रितीने संगीत केंद्र चालविण्यात येते.  या विद्यालयाने संगीत शिक्षणात उत्कृष्ट कामगिरीबद्दल सन 2021-22 वर्षाचा आदर्श केंद्र व्यवस्थापक पुरस्कार मिळाला आहे. दिनांक 28 ऑगस्ट रोजी मुंबई येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमात अंध विद्यालयाचे प्राचार्य व्ही. के. कांबळे यांनी हा पुरस्कार स्वीकारला आहे.

किनवट तालुक्यातील आदिवासी ग्रामीण दुर्गम भागात मागील 60 वर्षापासून बोधडी येथे अंध विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यात येते. तसेच संगीत शिक्षणासाठी अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ मुंबई या संस्थेची अंध विद्यालय सलग्नित आहे. कै. पं. वसंत शिरभाते गुरुजी आणि तत्कालीन प्राचार्य कै. भीमराव टारपे यांच्या अथक परिश्रमातून सन 1982 पासून अंध विद्यालयात संगीत केंद्र चालू आहे. संगीताचे धडे घेऊन अनेक अंध व डोळस विद्यार्थ्यांनी संगीत विषयाचे शिक्षण घेऊन रोजगार मिळवला आहे.  

सध्या या शाळेत संगीत शिक्षक म्हणून राजेश ठाकरे गुरुजी हे दोन्ही डोळ्यांनी अंध असून आदिवासी ग्रामीण भागातील अंध व डोळस विद्यार्थ्यांना प्रारंभिक ते विशारदचे शिक्षणासह संगीताच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यांची मेहनत आणि जिद्द यामुळेच आज अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालय मुंबई या देशपातळीवर काम करणाऱ्या संस्थेनी दखल घेऊन बोधडी येथील अंध विद्यालयाचा आदर्श केंद्र व्यवस्थापक पुरस्कार देऊन गौरव केला आहे. यावेळी आदिवासी कला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राजेश टारपे, सचिव प्रकाश टारपे यांनी संगीत शिक्षक राजेश ठाकरे गुरुजी व प्राचार्य व्ही. के. कांबळे यांचे अभिनंदन केले आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी