‘स्वारातीम’ विद्यापीठाचा २८ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा -NNL


नांदेड|
हैदराबाद मुक्ती संग्राम दिन आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या २८ व्या वर्धापनदिनानिमित्त दि. १७  सप्टेंबर रोजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांच्या शुभ हस्ते प्रथमता पुण्य स्वामी रामानंद तीर्थ यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. सकाळी ०८ वा. राष्ट्रीय ध्वजारोहण आणि ०८:०५ मि. विद्यापीठ ध्वजारोहण कुलगुरू महोदयांच्या हस्ते संपन्न झाला. याबरोबर विद्यापीठाच्या स्वागत कक्षामध्ये विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी केशव सीताराम उर्फ प्रबोधनकार ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. 

यावेळी कुलगुरूंनी उपस्थितांना वर्धापनदिनानिमित्त शुभेच्छा देत विद्यापीठाची विकासाच्या दृष्टीने होत असलेली वाटचाल यावर थोडक्यात माहिती दिली. यावेळी विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागातर्फे ‘आझादी का अमृत महोत्सव’ निमित्त विभागीय देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धेचे आयोजनही करण्यात आले होते. वर्धापनदिनानिमित्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची क्रिकेट स्पर्धा ठेवण्यात आलेल्या आहेत. कुलगुरू महोदयांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. कु. सोनल सावंत यांनी आशियाई पावर लिफ्टिंग स्पर्धेमध्ये रौप्य पदक प्राप्त केल्याबद्दल त्यांना प्रोत्साहनपर २ लक्ष रुपयांचा धनादेश देवून सन्मान करण्यात आला. वाहन चालक दिनानिमित्त विद्यापीठातील सर्व वाहन चालकांना कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देवून सन्मान करण्यात आला.   

यावेळी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन, कुलसचिव डॉ. सर्जेराव शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. दिगंबर नेटके, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. एल.एम. वाघमारे, मानव्य विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. अजय टेंगसे, नवोपक्रम नवसंशोधन व साहचर्य मंडळाचे संचालक डॉ. राजाराम माने, वित्त व लेखाधिकारी डॉ. गोविंद कतलाकुटे, क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाचे संचालक डॉ. विठ्ठलसिंह परिहार, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सूर्यप्रकाश जाधव, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. मलीकार्जुन करजगी यांच्यासह विद्यापीठातील शिक्षक, अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. राजेंद्र गोणारकर यांनी केले. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी