नांदेड| नांदेड जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीचा विस्तार दिवसेंदिवस वाढतो आहे. शहरी आणि ग्रामीण भागामध्ये भारतीय जनता पार्टी शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी खा. चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली सक्षमपणे बांधणी सुरू आहे. त्यातच काल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉक्टर शाम तेलंग यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे कंधार - लोहा विधानसभा मतदारसंघात नांदेड जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीला बळकटी मिळत आहे.
जागतिक कीर्तीचे नेते, देशाचे कणखर नेतृत्व ,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात स्वच्छ आणि पारदर्शी शासन सुरू आहे. ज्या ज्या घटकांसाठी शासकीय योजना तयार करण्यात आल्या. त्या त्या घटकासाठी भ्रष्टाचार मुक्त कारभार चालवत योजनांचा प्रत्यक्ष लाभ दिला जात आहे. शेतकरी, मजूर, सर्वसामान्य , नागरिक, व्यवसायिक ,उद्योजक, नोकरदार ,कृषी यासह सर्वच क्षेत्राला देशात भरभराटी सुरू आहे. भ्रष्टाचार मुक्त प्रशासन चालवत असतानाच भारतीय जनता पार्टीने सर्वसामान्यांचा सर्वांगीण आणि शाश्वत विकास हे लक्ष ठेवून काम केले आहे.
त्यामुळे गेल्या 75 वर्षात देशाचा जो विकास होऊ शकला नाही तो केवळ सात वर्षांत करून दाखवण्याची किमया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारने केले आहे .महाराष्ट्र राज्यातही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकासाची गंगा प्रवाही झाली आहे .शहरी आणि ग्रामीण भागाच्या विकासाचा समतोल साधत असताना नांदेड जिल्ह्यासह महाराष्ट्राला राष्ट्रीय महामार्गाने जोडत देशाच्या दळणवळणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम भारतीय जनता पार्टीने केले आहे. नांदेड जिल्ह्यातही राष्ट्रीय महामार्गाचे जाळे तितक्याच बळकटपणे उभारण्यात येत आहेत. त्यामुळे शाश्वत विकासाच्या कामामुळे आणि समृद्ध नेतृत्वामुळे भारतीय जनता पार्टीकडे काँग्रेससह अनेक पक्षातील पुढारी, नेते मोठ्या प्रमाणात आकर्षित झाले आहेत . देशाचे भविष्य घडविण्याचे काम भारतीय जनता पार्टीच करू शकते असा विश्वास बळावलेल्या अनेक नेत्यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये येण्याचा ओघ सुरूच आहे.
नांदेड जिल्ह्यात खा. चिखलीकर यांच्या प्रयत्नांमुळे विकासाची कामे मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे काँग्रेसमधील अनेक नेते भाजपाच्या संपर्कात आहेत. त्यातच काँग्रेसचे ज्येष्ठनेते तथा लोहा कंधार विधानसभेचे प्रभारी डॉक्टर शाम तेलंग यांनी काल भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. त्यामुळे कंधार - लोहा व मुखेड विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला खिंडार पडले आहे. डॉ.तेलंग काँग्रेसमध्ये काम करूनही त्यांना मान आणि सन्मान मिळाला नाही. केवळ त्यांचा वापर करण्यात आला होता. विकासाची खरी तळमळ असलेल्या डॉक्टर श्याम तेलंग यांच्या विचारांनाही काँग्रेसने लक्षात घेतले नव्हते. त्यामुळे डॉक्टर तेलंग यांनी विकासासाठी अहोरात्र कष्ट करणाऱ्या भारतीय जनता पार्टीचा मार्ग स्वीकारण्याची निश्चित केले. खा.चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली अखेर त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित भाजपात प्रवेश केला.
यावेळी भारतीय जनता पार्टी संघटन मंत्री संजय कौडगे, भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर, भारतीय जनता पार्टी महानगर जिल्हाध्यक्ष प्रवीण साले, आमदार राम पाटील रातोळीकर, आमदार तुषार राठोड, आमदार भीमराव केराम, आमदार राजेश पवार, भारतीय जनता पार्टी वैद्यकीय आघाडीचे संयोजक डॉक्टर अजित गोपछडे, भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या उपाध्यक्षा सौ.प्रणिताताई देवरे चिखलीकर, प्रदेश कार्यकारणी सदस्य दिलीप कंदकुर्ते, संतुकराव हंबर्डे, मिलिंद देशमुख, चैतन्यबापू देशमुख, बालाजी बच्चेवार, सौ संध्याताई राठोड,बाळू खोमणे, भारतीय जनता पार्टी दिव्यांग आघाडीचे प्रभारी रामदास पाटील, मनपा विरोधी पक्षनेते दीपकसिंह रावत, भारतीय जनता पार्टी जिल्हा सरचिटणीस गंगाधरराव जोशी, प्रवीण पाटील चिखलीकर, लक्ष्मणराव ठक्करवाड, श्रावण पाटील भिलवंडे, माधव उच्चेकर, डॉक्टर सचिन उमरेकर, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे प्रदेश सचिव अनिल पाटील बोरगावकर, माजी जि.प.सदस्य गणेशराव सावळे, बाळासाहेब देशमुख यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.