खाजगी शिक्षक व शिक्षकेतर महासंघाच्या जिल्हाध्यक्ष पदी हरीभाऊ चव्हाण -NNL


लोहा|
खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्याच्या प्रश्नावर गेली २५ वर्षा पासून अहोरात्र लढा देणारे लोह्याचे शिक्षक नेते हरिभाऊ यशवंराव पाटील चव्हाण यांची जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. संघटनेचे नेते जी एस चितमलवार यांच्या उपस्थितीत ही निवड करण्यात आली

प्राथमिक शिक्षकांच्या पगारासाठी स्वतंत्र पे युनिट, वेतनासाठी ८०:२०  ची अट रद्द, अप्रशिक्षित शिक्षकांना सेवेत सामावून घेणे यासह प्राथमिक शाळेसाठी वेतनेतर अनुदान असा अनेक प्रश्नावर हरिभाऊ चव्हाण  यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. लोहा कंधार तालुक्यात ही शिक्षक संघटना अतिशय पॉवर फुल राहिली. संघटनेचे नेते जी एस चिटमवार तसेच आरेफखान यांनी खाप्राशा शिक्षक संघटना मजबूत केली त्याच संघटनेला वाहून घेतलेले हरिभाऊ चव्हाण यांची जिल्हाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली रविवारी लोहा येथे श्री चिटमलवार यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली 

महाराष्ट्र राज्य मान्य  खाजगी शिक्षक व शिक्षकेतर महासंघ जिल्हा नांदेडच्या अध्यक्ष पदी लोहा येथील  चळवळीतील सक्रिय शिक्षक नेते हरीभाऊ चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे. नांदेड येथे  महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी महासंघाची बैठक जिल्हाध्यक्ष जी.एस. चिटमलवार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात येवून विविध विषयांवर चर्चा करून  महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी महासंघाची नुतन जिल्हा कार्यकारिणीची निवड करण्यात आली.

महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी शिक्षक व शिक्षकेतर महासंघाची जिल्हा कार्यकारिण या प्रमाणे  कार्याध्यक्ष -एल.एम.जाधव, सचिव - हनमंत डाकोरे, उपाध्यक्ष - सौ. चित्रलेखाताई गोरे, उपाध्यक्ष -अशोक दगडे, उपाध्यक्ष- डी.एन. केंद्रे, सहसचिव मठपती, कोषाध्यक्ष वैजनाथ दमकोंडवार, हिसोब तपासणीस- वडले,संघटनमंत्री - दिंगाबर वाघमारे, महिला प्रतिनिधी-जयश्री वाठेकरी, मुख्याध्यापक प्रतिनिधी - मिर्झा बेग, प्रसिद्धी प्रमुख- विठ्ठल चंदनकर, सभासद - संदीप संगनवार, सभासद सुर्यकांत लुंगारे, सभासद- दत्तात्रय देशमुख, सभासद- शिवाजी जाधव, सभासद- राजेश्वर पांगरे, सभासद- चंद्रकांत नेमाणीवार, जिल्हा प्रतिनिधी - हरीहर चिवडे आदीची निवड करण्यात आली.सर्व नवनियुक्त पदाधिकारी यांचे अभिनंदन करण्यात आले 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी