तृतीयपंथीयांचे समस्यांच्या निवारा साठी आरक्षण गरजेचे - डॉ. सान्वी जेठवाणी
पुणे| मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने तृतीयपंथीयांचा लोकशाहीतील सहभाग ही राज्यस्तरीय दोन दिवसीय परिषद पुणे विद्यापीठातील संत नामदेव सभागृह येथे नुकतेच पार पडले. या दोन दिवसीय परिषद व चर्चासत्रामध्ये ऐकून सात सत्रा मध्ये अनेक मान्यवरांना वक्ते म्हणून आमंत्रित करण्यात आलं होतं. यामध्ये नांदेड येथील नुकतेच पुरुषातून स्त्री जगामध्ये प्रवेश केलेले डॉ. सान्वी जेठवाणी यांना वक्ता म्हणून या चर्चासत्रामध्ये सामील होण्यासाठी आमंत्रित करण्यात आलं होतं.
आज तृतीयपंथीयांना अनेक समस्यांना पुढे जावं लागत आहे समाजामधून मिळणारी अवहेलना, घरापासून लांब राहावं लागत आहे, रोजगार, शिक्षण, हक्काचे घर असे अनेक समस्या आज या समाजापुढे आहेत. पण समाज कुठेतरी बदलत आहे किंवा सरकार अनेक प्रयत्न करून या समाजाला मुख्य प्रवाह सोबत जोडण्याचे काम करत आहे असे अनेक उदाहरण आणि प्रश्नांची उत्तर किंवा ज्या समस्या आहेत त्या कशा पद्धतीने सोडवता येतील या उद्देशाने या परिषदेमध्ये विविध चर्चा रंगल्या. अगदी राजकीय मंडळी पासून ते प्रशासकीय त्यासोबतच अनेक तृतीयपंथांना आमंत्रित करण्यात आलं होतं.
डॉ. सान्वी जेठवाणी यांनी यावेळी आपल्याला आलेले अनुभव व करियर यशस्वी करण्यासाठी तृतीयपंथीयांना कशा पद्धतीने मदत होईल याची सविस्तर माहिती यावेळी मंचावरून दिली त्यासोबतच तृतीयपंथीयांचा समस्यांना निवारा करण्यासाठी त्यांनी यावेळी एक टक्का आरक्षण सर्व स्तरावर या घटकाला मिळावं अशी मागणी केली त्यासोबतच आमचा प्रतिनिधी संसदेत आणि विधान परिषदेत असावा जेणेकरून आमच्या लोकांच्या समस्यांना राष्ट्रीय मंचावर घेऊन जाण्याचा आम्हाला संधी मिळेल आणि आम्ही देखील राजकारणात सक्रिय होऊ आणि या समाजाच्या मुख्य घटकांसोबत जोडण्याचा प्रयत्न देखील होईल अशी मागणी यावेळेस त्यांनी केली.
ज्या सावित्रीबाई फुले यांनी अनेक कष्ट व समाजाच्या त्रासाला सहन करून शिक्षणासाठी आपली लढाई सुरूच ठेवली अशा आम्ही आजच्या द्रौपदी आपल्या अनेक समस्यांना पुढे जात एक नवीन दिशा शोधत स्वतःसाठी काहीतरी करत आहोत व समाजासाठी आम्हीही प्रयत्नशील आहोत हे त्यांनी आपल्या भाषणातून दाखवून दिल. या दोन दिवसीय राज्यस्तरीय परिषदेचे उद्घाटन राष्ट्रवादीचे खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते झालं तर यावेळी विविध राजकीय मंडळी देखील उपस्थित होती. ही राज्य स्तरीय परिषद संपून डॉ. सान्वी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांना या समस्यांबद्दल अवगत केलं व अनेक राज्यांमध्ये तृतीयपंथीयांना आरक्षण मिळाला आहे.
ते उदाहरण देत आपणही महाराष्ट्र मध्ये त्वरित हे काम करावं असे निवेदन केले व लवकरच या संदर्भात बैठक बसून समाज कल्याण च्या माध्यमाने अनेक उपक्रम राबवण्याची विनंती देखील केली. तृतीयपंथी यांच्यासाठी व माझ्याकडे आता हा समाज एक पुढील आपला नेता म्हणून बघत आहे तर मी नक्कीच आपल्या समाजासाठी काम करत राहणार आणि ज्या समस्या सोप्या रीतीने सोडवता येईल अथवा दिल्लीपर्यंत ज्याचा आवाज उठवाव लागेल ते सर्व करायला मी तयार असल्याचं डॉ. सान्वी जेठवाणी यांनी पत्रकारांना सांगितलं.