सिरंजनी ग्रामपंचायत कडून शाळकरी मुलांसाठी रस्ता मजबुतीकरण..NNL

सरपंच सौ. मेघा पवन करेवाड यांचा स्तुत्य उपक्रम..


हिमायतनगर, साईनाथ देशमाने।
हिमायतनगर तालुक्यातील सिरंजनी येथील ग्रामपंचायत नेहमीच या ना त्या सामाजिक कार्याबद्दल चर्चेत आसते. गेल्या अनेक वर्षांपासून नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून मागील काही महिन्यांपूर्वी च या ग्रामपंचायत ने आदर्श पुरस्कार देखील प्राप्त केला आहे. येथील युवा सरपंच सौ. मेघा पवन करेवाड यांनी आपल्या काम करण्याच्या शैलीतून तालुक्यात वेगळी ओळख निर्माण केली आहे.

 सिरंजनी येथील विद्यार्थ्यांना शाळा व महाविद्यालय साठी तालुक्याच्या ठिकाणी जावे लागते. परंतु शाळकरी मुलांची बस ही आय. टी. आय. मार्गे हिमायतनगर बस स्थानकात दाखल होते. या मार्गात गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्याची दयनीय अवस्था झालेली आहे. व पावसामुळे मोठमोठे खड्डे पडले असून प्रवास करताना जीव धोक्यात घालून शाळकरी मुलांना शाळा, कॉलेज साठी जावं लागतं असे.. हि गंभीर बाब कर्तव्यदक्ष सरपंच सौ. मेघा पवन करेवाड यांच्या लक्षात येताच. 

त्यांनी सदरील रस्त्याची पाहणी केली व तात्पुरती उपाय योजना म्हणून ग्रामपंचायत मार्फत सदरील रस्त्यावर मुरूम टाकून रस्त्याचे मजबुतीकरण केले. सदरील कामाचे कौतुक एस टी महामंडळ च्या कर्मचाऱ्यांसह शिक्षण प्रेमी पालक वर्गातून होत आहे.. या कामासाठी सिरंजनी येथील शिक्षण प्रेमी पालक व युवकांनी विशेष परिश्रम घेतले आहे.. यामध्ये सिरंजनी ग्रामपंचायत चे सर्व सन्माननीय सदस्य,सरपंच प्रतिनिधी श्री पवन नारायण करेवाड, माधव देशमाने, प्रल्हाद भाटे, समाधान म्याकलवाड, बालाजी तुपेकर, नवनाथ बलपेलवाड, सतीश राहुलवाड सह अनेकांनी परिश्रम घेतले..

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी