ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत सहा ठिकाणी विसर्जन, कडेकोट पोलिस बंदोबस्त, मुख्य मिरवणुकीत गुलाल ऐवजी पुष्पवृष्टी -NNL

नविन नांदेड| ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत सार्वजनिक शहरी व ग्रामीण भागातील श्री विसर्जन साठी सहा ठिकाणी होणार असुन संबंधित ठिकाणी कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला असून सिडको परिसरातील मुख्य मिरवणुकीत गुलाल ऐवजी पुष्प वृष्टी करण्याचा संकल्प ग्रामीण पोलीस स्टेशन चे पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड यांनी केला असून यासाठी शेकडो किवटंल झेडु, गुलाब व गलांडा फुले मागविण्यात आली आहेत.

ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत शहरी भागात परवानगी असलेले २४ व विनापरवाना ८   तर ग्रामीण भागात २४ तर  विनापरवाना  १६ अशा सार्वजनिक गणेश मंडळांनी नोंद केली आहे.९ सप्टेंबर अंनत चतुर्थी निमित्ताने विष्णुपुरी काळेशवर,नावघाट, साईबाबा मंदिर कौठा, नविन पुल कौठा,वाजेगाव जुना पुल, व नानकसर झरी येथे करण्यात आली आहे,श्री विसर्जन मिरवणूक अनुषंगाने १४ अधिकारी व ६६ पोलीस अंमलदार, ६४ पुरूष व महिला होमगार्ड, राखीव पोलीस दल २० असा बंदोबस्त लावण्यात आला आहे. 

सिडको हडको परिसरातील मुख्य मार्गावर श्री विसर्जन अनुषंगाने गुलाल ऐवजी पुष्प वृष्टी करण्याचा संकल्प ग्रामीण पोलीस स्टेशन चे पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड यांनी केला असून यासाठी ग्रामीण भागातील शेतकरी बांधव यांच्या कडून शेकडो किवटंल फुले विकत आणली आहेत ही फुले गणेश मंडळ पदाधिकारी यांच्या मार्फत पोलीस दलाचा साह्याने पुष्प वृष्टी करण्याचा संकल्प ग्रामीण पोलीस स्टेशन चे पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड यांनी केला आहे. 

सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत शहरी भागात श्री मुर्तीचे संकलन..

नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत ९ सप्टेंबर रोजी श्री विसर्जन मुर्तीच्या अनुषंगाने  नाव घाट, साईबाबा मंदिर जुना कौठा ,व नानकसर झरी या ठिकाणी कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्याची माहिती सहाय्यक आयुक्त डॉ.रईसौधदीन यांनी दिली. अनंत चतुर्दशी चा निमित्ताने घरगुती व छोटे गणपती मंडळा कडुन मुर्ती व निर्माल्य नदी पात्रात  विसर्जित होण्याची शक्यता असल्याने सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत असलेल्या नानकसर सहिब झरी खदान तलावात मोठया गणपतीचे विसर्जन व्यवस्था करण्यात आली असून सिडको  क्षेत्रीय कार्यालय येथे मुर्ती संकलन  केंद्र करण्यात आले असून वसरणी नावघाट, साईबाबा मंदिर देवस्थान जुना कौठा, येथे नियुक्ती करण्यात आली आहे. संबंधित गणेश मूर्ती घाटावर व केंद्रावर देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी