नांदेड न्यूज लाइव्हने वृत्त प्रकाशित करताच आ.जवळगावकरानी घेतली दखल
दिवाळीनंतर या रस्त्यावर सिमेंट काँक्रेटीकरण करून कायम तोडगा काढणार
हिमायतनगर, अनिल मादसवार| शहरातून टेभी, आंदेगाव, पार्डी, एकघरी, वाशीकडे जाणाऱ्या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली होती. याबाबतचे वृत्त नांदेड न्यूज लाइव्हने प्रकाशित करताच आ. माधवराव पाटील जवळगावकर यांनी प्रत्यक्ष भेट देऊन या रस्त्याची पाहणी केली. तसेच तातडीने या रस्त्यावर रेल्वे ब्रिजच्या अलीकडे पडलेले सर्व खड्डे बुजविण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग ठेकेदाराला सूचना देऊन स्वतः उभे राहून खड्डे बुजविण्याचे काम करून घेतले आहे. रस्त्यावरील खड्डे बुजविले गेल्यामुळे या रस्त्याने ये-जा करणाऱ्याना तात्पुरता दिलासा मिळेल अशी प्रतिक्रिया देत दिवाळीनंतर या रस्त्यावर सिमेंट काँक्रेटीकरण करून कायम तोडगा काढणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
यामुळे तात्पुरती या रस्त्याची दुरुस्ती झाली असली तरी दिवाळीनंतर या रस्त्याचे कामे नव्याने सुरु केले जाणार असून, दोन्ही बाजूने नाल्या आणि मध्ये रेल्वे लैंपर्यंत सिमेंट काँक्रेटीकरण केले जाणार आहे. त्यामुळे पुढील गावाला जाणाऱ्या रस्त्याची कायम समस्या दूर केली जाईल असे आश्वासन आ.जवळगावकर यांनी दिले. तसेच रेल्वे अंडर ब्रिज रस्त्याच्या पुढील काम सुद्धा केले जाणार असून, वाशी घाटात सध्या तात्पुरती दुरुस्ती झाली आहे. लवकरच तेलंगणा बॉर्डर रस्त्यापर्यंत सिमेंट काँक्रेटीकरण करून दोन्ही बाजूने सुरक्षा बेरिकेट बसवून अपघात होणार नाही याची काळजी रस्ता बनविताना घेतली जाईल असा मानस असल्याचे ते म्हणाले.
यावेळी शहरानजीक रस्त्याचे खड्डे बुजविताना रस्त्याने ये-जा करणारे नागरिकांनी समाधान मानले असून, अनेक वर्षांपासून या रस्त्याच्या दयनीय अवस्थेमुळे नागरिकांना मोठ्या अडचणीतून जीवघेणा प्रवास करावा लागला असल्याचे सांगितले. त्यामुळे आता लवकरच या रस्त्याच्या कटकटीपासून कायमची सुटका होईल अशी अपेक्षा पार्डी, एकघरी, वाशी, टेभी, आंदेगाव, पवना, आदी गावासह तेलंगणा राज्याकडे जाणाऱ्या नागरिक, प्रवाशांना लागली आहे. यावेळी त्यांच्यासोबत माजी जि.प. सदस्य सुभाष दादा राठोड, डॉ.भिसीकर, ता.काॅ. माजी अध्यक्ष जनार्धन ताडेवाड, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डाॅ. प्रकाश वानखेडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक रफीक सेठ, प्रथम नगराध्यक्ष अ. अखील, विठ्ठल ऐरणकर , काँग्रेसचे शहराध्यक्ष संजय माने, माजी जी.प.सदस्य समदखाॅन पठाण, अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष फेरोजखान पठाण, सेवा सहकारी सोसायटीचे संचालक सुभाष शिंदे, माजाची नगरसेवक शेख रहीम पटेल, दगडू काईतवाड, बळवंत जाधव, योगेश चिल्कावार, ज्ञानेश्वर शिंदे, बाकी सेठ, असलम भाई भांडेवाले, फेरोज कुरेशी, दिपक काञे, अंकुश मोरे, सरपंच सुनिल शिरडे, केरबा सुद्धेवाड, आदीसह अनेक काॅग्रेसचे सर्व कार्यकर्ते उपस्थीत होते.