शाखाधिका-यानी नागरिकांना सुविधा न देता चालवली होती हुकुमशाही
मुखेड,रणजित जामखेडकर| मुखेड येथील स्टेट बँक आँफ इंडीयाची शाखा असुन या शाखेचे शाखाधिकारी नरेश गड्डम हे मनमानी करीत असुन शाखा ही स्वताची मालमत्ता असल्यासारखे वागत असुन तात्काळ त्यांच्या मनमानी कारभार थाबंवावा अन्यथा तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा तहसिलदार काशीनाथ पाटील यांना निवेदनाद्वारे शिवसेनेचे बालाजी पाटील ढोसणे यांनी दिला.
मुखेड तालुक्यातील सर्वात मोठी शाखा म्हणुन एसबिआय शाखा असुन या शाखेकडे सर्व शासकीय विभागाचे, व्यापारी वर्गाचे,शेतकरी बांधव व शिक्षकांचे खाते असुन या खातेदारांना शाखाधिकारी ऊध्दट वागणुक देत असुन त्यांच्या मर्जीतल्या लोकांना नियमबाह्य सहकार्य असुन एकीकडे ऐन दुष्काळात शेतकर्यांना वसुली साठी तगादा लावत आहेत. तर दुसरीकडे सिसि लोन धारकांना अमाप कर्ज वाटप करुन जावयाची वागणुक देण्यात येत आहे. शाखेतीलच शेतकर्यांना खात्यावर इन्सुरन्स असुनही शिरुर दबडे येथील मयत शेतकरी संग्राम गोविंद काळीकोटे अतिवृष्टीच्या पुरात वाहुन मृत्यु झाला त्यांना तहसिलचे अनुदान मिळाले. पण इन्सुरन्स क्लेम मिळत नाही.
ऊलट शाखाधिकारी मयताच्या वारसांना बँकेच्या बाहेर हाकलुन पोलीस केस करण्याची धमकी देत असल्याचा प्रकार घडल्याने मयताच्या टाळु वरचे लोणी खाण्याचा प्रकार शाखाधिकारी करीत असुन, या शाखाधिकार्याने शिक्षक महिलेल्या पण सोडले नाही. संबधित शिक्षिकेने तर मँनेजरच अरेरावी करुन माझ्या वडिलाचे इन्सुरन्स क्लेम देत नसुन शाखेचे योनो अँप चालु करुन देत नसुन जाणुन बुजुन ञास देत असुन, संबधित शाखाधिकार्याने मला जाणीवपुर्वक वैयक्तिक लोन साठी वंचीत ठेवल्याने त्यांच्यावर कडक कार्यवाही करण्याची मागणी केली.
सर्वसामान्य खातेदारातुन ग्राहकांना गेली दोन दोन महिने पासबुक देत नसुन अपमानीत करुन बाहेर हाकलल्याचा खातेदार लुतन सहनी या खातेदारांनी केला. तर व्यापारामध्ये श्री स्वामी समर्थ इंटरप्रायझेसचे गजाननराव गोरे यांनी शाखाधिकारी गड्डम हे माझ्या ओडी खात्याला लोन देवुन व्यवस्थितीत कर्जाचे हफ्ते भरत असतानाही खाते एनपिए मध्ये टाकत असुन, विचारणा करण्यासाठी गेल्या सहा महिन्यापासुन बँकेत चकरा मारत आहेत. शाखाधिकारी गड्डम हे पाटीलकडे जावा व पाटील म्हणतो गड्डमकडे म्हणत मानसीक ञास दिल्याचे सांगीतले.
तर शहरातील शाळेच्या मुख्याध्यापकाचे खात्यावर रक्कम असुनही कर्जाचे हफ्ते कपात न करता त्यांचे एनपिए मध्ये टाकल्याची तक्रारच केली असुन या बाबतीत वरीष्ठ शाखेचे रिजनल मँनेजरने तात्काळ लक्ष घालुन संबधिताचे निलंबन करावे शहरातील विशिष्ट लोकांना वाटप करण्यात आलेल्या कर्ज वाटपाची चौकशी व्हावी व शाखाधिकारी नरेश गड्डम यांना निलंबित करण्याची मागणी तहसिलदार काशीनाथ पाटील यांच्याकडे शिवसेनेच्या शिष्टमंडळाने केली.यावेळी शिवसेना शहरप्रमुख शंकर चिंतमवाड,कैलास राहेरकर,माधव देवकत्ते, राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष रमाकांत पाटील जाहुरकर,सरपंच प्रतिनिधी पंढरी कांबळे,अविनाश इंगळे,ज्ञानेश्वर कोंडामंगले,गजानन मोरे,लुतन सहनी,चंद्रकांत काळीकोटे,यासह कर्मचारी व्यापारी यासह शेतकरी बांधव मोठ्या संख्येने ऊपस्थितीत होते.
परवाच कंञाटी कर्मचार्यांला शाखाधिकारी यांनी मानसिक ञास दिल्याने त्या कर्मचार्यांचा र्हदविकारांच्या झटक्याने मृत्यु झाला असुन या मृत्यु शाखाधिकारी जबाबदार असल्याची चर्चा गेल्या तिन दिवसापासुन बँक परीसरात व संपुर्ण शहरात आहे.यामुळे तात्काळ शाखाधिकार्यांची विशेष यंञणे मार्फत चौकशी करुन निलंबणाची कार्यवाही करावी खातेदारांत शाखाधिकार्या बाबतीत अपमानकारक वागणुक दिल्याने प्रचंड संताप असुन तात्काळ निलंबनाची कार्यवाही अन्यथा जनतेचा ऊद्रेक होणार असल्याचे शिवसेनेचे बालाजी पाटील ढोसणे यांनी सांगीतले.