नांदेड| स्वस्थ नारी सशक्त नारी, स्वस्थ बालक सशक्त भारत याविषयावर आज जिल्हा रुग्णालयात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नीलकंठ भोसीकर यांच्या हस्ते आहार प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. शासनाच्यावतीने 1 ते 30 सप्टेंबर 2022 हा “राष्ट्रीय पोषण महिना” म्हणून साजरा करण्यात येत आहे. यानिमित्ताने हे प्रदर्शन आयोजित केले होते. महिला व बालकांचे आरोग्य सुदृढ करण्यासोबत त्यांच्या पोषण विषयक स्थितीमध्ये सुधारणा करण्यासाठी जनजागृती करण्यात येत आहे.
यावेळी निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. माने, डॉ. बुट्टे, डॉ हणमंत पाटील, डॉ. साखरे, मेट्रन श्रीमती जाधव, श्रीमती नरवाड सिस्टर यांची उपस्थिती होती. आहार प्रदर्शनासाठी डायट चार्ट आणि अन्न धान्य व पोषक पाककृती यांची प्रदर्शन आहारतज्ञ श्रीमती रेशमा मललेशे यांनी मांडणी केली. यावेळी रुग्ण व नाते नातेवाईक यांना पोषक आहाराबाबत माहिती सांगण्यात आली. यावेळी डॉ, सुजाता राठोड, डॉ. जाधव, डॉ. ढगे, डॉ. तडवी, डॉ. रहेमान, डॉ. अनुरकर, डॉ तजमुल पटेल, कुलदीपक उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी नरवाड सिस्टर, धनश्री गुंडाळे समुपदेशक, इंगळे सिस्टर, सीमा सरोदे सिस्टर व नर्सिंग स्टुडंट व कर्मचारी यांनी मदत केली.