मुंबई/नांदेड| हदगाव - हिमायतनगर विधानसभा मतदार संघात अतिवृष्टीने थैमान घातले आहे, या नुकसानीमुळे बळीराजा पुरता खचला आहे. पंचनामे न करता शेतकऱ्यांना मदतीचा हातभार लावावा आणि या संकटातून त्यांना बाहेर काढण्यासाठी तातडीने मदत द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
हिमायतनगर तालुक्यात दि. २७, २८, २९ सप्टेंबर रोजी व त्या अगोदर सुध्दा अतिवृष्टी सदृश्य पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास ज्यामध्ये सोयाबीन, कापुस, तुर व इत्यादी पिके पावसामुळे हातची गेली आहेत. हदगाव हिमायतनगर तालुक्यात अतिवृष्टी होऊन पुर परस्थिती निर्माण झाली असल्याने माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांनी पूरग्रस्त भागाचा दौरा केला. दौरा करताना असे लक्षात आले की, पीकाचे 100% नुकसान झाले. त्यामुळे माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांनी थेट मुंबई गाठून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांची भेट घेऊन हदगाव हिमायतनगर तालुक्यात जी परिस्थिती आहे ती स्पष्टपणे पटवून सांगितली.
जवळपास अर्धा तास झालेल्या चर्चेत त्यांनी हदगाव-हिमायतनगर ओला दुष्काळ जाहीर करून त्वरित मदत मिळून देण्यात यावी अशी मागणी करून या संदर्भाचे निवेदन दिले. इसापुर धरणातील अतिरीक्त पाणी पैनगंगा नदि पात्रात सोडल्यामुळे पैनगंगा कयाधु नदिला महापुर येवुन नदिकाठच्या गावात, शेतात पाणी घुसले. त्यामुळे शेतातील कापनीपश्चात सोयाबीन, उभा कापुस वाहुन गेला त्या सोबत जमिनी एक ते दिड मीटरने खरडल्या आहेत. तात्काळ पुराच्या पाण्याने झालेल्या शेतीचे पंचनामे न करता सरसकट आर्थीक मदत करावी अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे त्या मागणीची दाखल घेऊन त्यांनी थेट मुंबई येथे मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे.