हदगाव| पंचशील माध्यमिक विद्यालय हदगांव मधील विनाअनुदानित शिक्षक/ शिक्षिका मागील दहा वर्षापासून कोणत्याही मानधना विना काम करीत आहे. वेतन मिळावे यासाठी अनेक वेळा निवेदने तसेच आंदोलने करुन शासनास जाग आली नाही शासनास मेल द्वारे स्वःइचछा मरणाची परवानगी मागुन सुधा कोणताही उपयोग झाला नाही.
म्हणून अनुदान मिळावे यासाठी संघटनेचे वतीने शिक्षक आमदार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु करण्यात आलेल्या पुणे ते मुंबई पायी दिंडीच्या समरनार्थ आज दिनांक 13/09/2022 पासुन मागण्या पुर्ण होईपर्यंत सर्व शालेय कामकाज व कामबंद अदोलनाचा मार्ग अवलंबीला आहे. या संदर्भाचे निवेदन गटशिक्षणाधिकारी साहेब हदगांव शिक्षणाधिकारी नांदेड, शाळेचे मु.अ व संबंधिताना निवेदन हदगांव तालुक्यातील संघटनेच्या वतीने देण्यात आले . या वेळेस महाजन जी के, हुलकाने, नरवाडे वाढवे, सुरोशे पठाण श्रीमती वानखेडे श्रीमती मोगले श्रीमती पिंपळे इत्यादी शिक्षक उपस्थित होते.