जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश डावलला; लोह्यात जनावरांचा बाजार भरला -NNL

मुख्याधिकाऱ्यांवर कार्यवाही करा-  काँग्रेस शहराध्यक्ष वसंतराव पवार


लोहा|
लोहा नगर पालिकेच्या आधिपत्याखाली जनावरांचा आठवडी बाजार मंगळवारी भरविला जातो. लम्पि आजारामुळे जिल्हा संरक्षित क्षेत्र घोषित करण्यात आला आहे. संसर्ग टाळण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी जनावरांचा बाजार -ने-आण, पशु प्रदर्शन यावर पुढील आदेशा पर्यंत प्रतिबंध घातला पण लोह्यात मात्र आठवडी जनावरांचा बाजार भरला. शहरातील स्वच्छता व गतिमान प्रशासनसाठी निष्क्रिय ठरलेल्या मुख्याधिकारी यांनी जिल्हाधिकारी यांचे आदेश डावलले व जनावरांचा बाजार भरू नये यासाठी आदेशाचे पालन केले नाही त्यामुळे मुख्याधिकारी यांच्यावर कडक कार्यवाही करावी अशी मागणी काँग्रेसचे शहराध्यक्ष वसंतराव पवार यांनी केली आहे.     

नगर पालिका प्रशासनाचा कारभार खाजगी आडत दुकानासारखा सुरू आहे की काय (?) असा सवाल शहरवासीय करत असतानाच शहरात मागील दहा-बारा दिवसा पासून डेंग्यू तापीचे रुग्ण आढळत आहेत. शहरात धूर - औषध फवारणी झाली नाही .प्रतिबंधात्मक उपाय योजना वेळेत झाल्या नाहीत. सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग दाढेल यांचा पुतण्याचे  डेंग्यू तापीमूळे निधन झाले . या घटनेमुळे शहरातील नागरिकांत प्रचंड असंतोष पसरला. दुसरीकडे मुख्याधिकारी यांच्यावर कोणाचाच वचक नाहीं मनाला वाट्टेल तेव्हा कार्यालयात येतात 

"लम्पी"  हा संसर्गजन्य रोग. गाय, बैल, म्हैस या जनावरात हा चर्म रोग  मोठ्या प्रमाणात पसरत आहे. या चर्म रोगाचा प्रादुर्भाव लक्षात घेता त्याला नियंत्रित प्रतिबंध निर्मूलन करण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी गुरांच्याने --आण करण्यावर, बाजार भरविण्यावर पशु प्रदर्शन यावर प्रतिबंध घातला आहे. मंगळवार हा लोहयाचा आठवडी व  जनावरांचा मोठा बाजार असतो. 

जनावरांच्या बाजार भरण्याला प्रतिबंध असतानाही नगर पालिका प्रशासनाने कोणतीच प्रतिबंधात्मक कार्यवाही केली नाही. पर्यायाने जनावरे बाजारात विक्रीसाठी आली. त्याचा परिणाम बाजार भरला त्यामुळे जिल्हाधिकारी यांच्या आदेशाची पायमल्ली मुख्याधिकारी व पालिका प्रशासनाने केली. जर जिल्हाधिकारी यांच्या अधिनिस्त असलेले अधिकारी आदेश मोडत असतीतर ते अयोग्य आहे. त्यामुळे मुख्याधिकारी पेंटे यांच्या कडक कार्यवाही झाली पाहीजे अशी मागणी काँग्रेसचे हे शहराध्यक्ष माजी नगरसेवक वसंतराव पवार यांनी केली आहे. 

सीओ नॉट रिजेबल - मुख्याधिकारी पेंट यांच्या निष्क्रियेतेमुळे शहरात दुर्गंधी..तुंबलेल्या नाल्या.. कचऱ्याचे ढिग...मुक्त डुकरांचा वावर ..अशी शहराची दुरावस्था झाली आहे.जिल्हाधिकारी यांचे आदेश डावलत जनावरांचा आठवडी बाजार भरला. या बाबत मुख्याधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता त्याचा मोबाईल नॉट रिजेबल होता त्यामुळे प्रतिक्रिया कळू शकल्या नाहीत.


Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी