भोकर/नांदेड| भोकर शहर व तालुक्यात चोरटयांनी धुमाकूळ माजविला आहे. वेगवेगळ्या गावातील घरांना लक्ष करून सोने - चांदीच्या दागिन्यांसह नागडी रक्कमेवर हात साफ केल्याच्या घटना घडल्या आहे. या चोरट्यांच्या मुसक्या आवळण्याचे आवाहन पोलीस प्रश्न जणू दिल्याचे सुरु असलेल्या घटनाक्रमावरून दिसते आहे.
दिनांक 11.09.2022 रोजी 10.00 ते 14.00वा. चे दरम्यान, फिर्यादीचे घरी रेणापुर ता. भोकर जि.नांदेड त्यांची पत्नी हि शेतात खत टाकण्यासाठी गेले होती. खत टाकुन दुपारी दोन वाजताचे सुमारास फिर्यादी घरी आला असता यातील नमुद आरोपी हा घराच्या पायर्या उतरत असताना फिर्यादीस धक्का मारून पळुन गेला. फिर्यादी व त्याचे पत्नीने घरात जाऊन पाहिले असता घराचा कडीकोंडा तोडुन आत प्रवेश करून कपाटाचे लॉक तोडुन आत मधील नगदी 20,000/-रूपये व सोन्याचे दागीने किंमती 65,000/-रूपयाचे असा एकुण 85,000/-रूपयाचा ऐवज चोरून नेला. अशी फिर्यादी अनिल जनार्धन येरेकर, वय 48 वर्षे, व्यवसाय शेती खाजगी वकीली रा. रेनापुर ता. भोकर जि. नांदेड यांनी दिलेल्या फिर्यादवरुन पोस्टे भोकर गुरन 355/2022 कलम 454,380 भादवी कायदा प्रमाणे गुन्हा दाखल असुन तपास सपोउपनि/देवकांबळे, मो.क्रं. 9623979181 हे करीत आहेत.
दुसरी घटना दिनांक 10.09.2022 रोजी 20.00 ते दि.11.09.2022 चे 07.45वा. चे दरम्यान, शहरातील अष्टविनायक नगर भोकर येथील फिर्यादी हे घराला कुलूप लावुन मुलांला भेटण्यासाठी नांदेड येथे आले असता कोणीतरी अज्ञात चोरटयाने त्यांच्या घराचे गेटचे व दाराचे कुलूप तोडुन आत प्रवेश करून नगदी 30,000/-रूपये व सोन्या चांदीचे पुजेच्या वस्तु असा अंदाजे किंमत 62,000/-रूपये असा एकुण 92,000/-रूपयांचा ऐवज चोरून नेला. अशी फिर्यादी महेश प्रभाकर चक्रावार, वय 45 वर्षे, व्यवसाय व्यापार रा. अष्टविनायकनगर भोकर ता. भोकर जि. नांदेड यांनी दिल्यावरुन पोस्टे भोकर गुरन 352/2022 कलम 457,380 भादवी कायदा प्रमाणे गुन्हा दाखल असुन तपास पोहेकॉ/2078 लक्षटवार, मो.क्रं. 9767114720 हे करीत आहेत.
तिसरी घटना दिनांक 11.09.2022 रोजी 18.00 वा. ते 23.00 वा. चे दरम्यान, डोरली शिवारातील डोंगर माथ्यावर ता. भोकर जि. नांदेड येथे घडली असून, यातील फिर्यादी हा नमुद ठिकणी त्याच्या मेंढया चारत असताना चार आरोपीतांनी संगणमत करुन मोटार सायकल क्रं. एम.एच.-26/बीवाय-0865 वर येवुन फिर्यादीच्या चार मेंढया एकुण किंमती 41,000/-रुपयाच्या चोरुन नेले. अशी फिर्याद बदा नाथा रबारी, वय 55 वर्षे, व्यवसाय मेंढपाळ रा. बहादुरी अंजाळा जि. कच्छभुज गुजरात राज्य यांनी दिल्यावरुन पोस्टे भोकर गुरनं 354/2022 कलम 379,34 भादवी कायदा प्रमाणे गुन्हा दाखल असून तपासपोह/1765 हनवते, मो.क्र. 9860719823हे करीत आहेत.