नांदेड| प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी, दक्षिण मध्य रेल्वे हुजूर साहिब नांदेड - पुरी – हुजूर साहिब नांदेड दरम्यान विशेष गाडीची एक फेरी चालवीत आहे, ती पुढील प्रमाणे –
गाडी क्रमांक 07565/07566 नांदेड - पुरी - नांदेड विशेष गाड्या : गाडी क्रमांक 07565 हुजूर साहिब नांदेड ते पुरी गाडी नांदेड येथून दिनांक 26 सप्टेंबर ला दुपारी 15.25 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सायंकाळी 17.30 वाजता पुरी येथे पोहोचेल. परतीच्या प्रवासात गाडी संख्या 07566 पुरी – हुजूर साहिब नांदेड हि गाडी पुरी रेल्वे स्थानकावरून दिनांक 27 सप्टेंबर ला रात्री 22.45 वाजता सुटेल आणि हुजूर साहिब नांदेड येथे दुसऱ्या दिवशी रात्री 01.00 वाजता पोहोचेल.
या विशेष गाड्या आपल्या मार्गात मुदखेड, धर्माबाद, बासर, निजामाबाद, कामारेड्डी, मेडचल, सिकंदराबाद, काझीपेठ, वारंगल, महबूबाबाद, खम्मम, कोंडपल्ली, रायनापडू, एलुरु, राजमुंद्री, समलकोट, अनकापल्ली, दुवाडा, सिंहाचालम, कोत्तवाळस, विजयानगराम, श्रीकाकुलम रोड, पलासा, बेरहांमपूर, खुर्दा रोड, येथेही थांबतील. या विशेष गाड्यांमध्ये ए.सी. टू टियर, ए.सी. थ्री टियर, स्लीपर क्लास आणि सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे असतील.