‘स्वारातीम’ विद्यापीठांतर्गत पदवी आवेदनपत्र १४ ऑक्टोबर पर्यंत स्वीकारण्यात येणार -NNL


नांदेड|
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा २५ वा दीक्षान्तसमारंभ लवकरच आयोजित करण्यात येणार आहे. त्यासाठी पात्र उमेदवाराकडून विहित नमुन्यातील पदवी प्रमाणपत्रासाठी दि.१५ सप्टेंबर ते १४ऑक्टोबर पर्यंत आवेदनपत्र स्वीकारण्यात येणार आहेत. त्यानंतर विलंब शुल्कासह ३१ ऑक्टोबर पर्यंत आवेदनपत्र स्वीकारण्यात येतील. यामध्ये हिवाळी-२०२१ व उन्हाळी-२०२२च्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचेच पदवी आवेदनपत्र स्वीकारण्यात येतील. अशा विद्यार्थ्यांनी पदवी आवेदनपत्र ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहे. विद्यापीठाचे संकेतस्थळ ( www.srtmun.ac.in )examination विभागांतर्गत Convocation Section मध्ये उपलब्ध आहे. 

पदवी आवेदनपत्र ऑनलाईन भरून त्याची प्रिंट संलग्नित महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या संलग्नित महाविद्यालयात व विद्यापीठाच्या परिसर संकुलातील विद्यार्थ्यांनी त्यांच्या संकुलात विहित शुल्कासह जमा करावेत.आवेदन पत्रावरील विद्यार्थ्यांच्या फोटोवर साक्षांकन केलेले व बाजूला एक अपलोड केलेल्याचा फोटोची प्रत आवेदन पत्रावर लावावी. पासपोर्ट साईजच्या फोटोचा बॅकग्राऊंड हा पांढराच असावा. विद्यार्थ्यांनी मराठीत व इंग्रजीमध्ये अचूक नाव स्वाक्षरी करणे अनिवार्य आहे. 

आवेदनपत्र भरताना विद्यार्थ्यांने Presentia किंवा Absentia म्हणजेच प्रत्यक्षात किंवा पोस्टद्वारे पर्याय निवडल्यानंतर त्याच प्रकारचेशुल्क भरणे आवश्यक आहे. हिवाळी-२०२१परीक्षेपूर्वी उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांनी विद्यापीठातील दीक्षान्त विभागात येऊन ऑनलाईन पद्धतीने भरलेले पदवी आवेदनपत्र विहित शुल्कासह जमा करावयाचे आहे. असे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ.दिगंबर नेटके यांनी कळविले आहे. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी