भोकर। महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग, नांदेड जिल्हा आरोग्य विभाग यांच्या वतीने " माता सुरक्षित तर घर सुरक्षित " हे अभियान दि. २६ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर नवरात्रोत्सव करण्यात येणार आहे. आज घटस्थापनेच्या मुहूर्तावर ग्रामीण रुग्णालय भोकर येथे रुग्ण कल्याण समितीचे सदस्य डॉ साईनाथ वाघमारे यांच्या हस्ते मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले.
" माता सुरक्षित तर घर सुरक्षित " या अभियान विषयी माहितीचे वाचन सत्यजीत टिप्रेसवार आरोग्य पर्यवेक्षक यांनी केले व वैद्यकीय अधीक्षक डॉ अशोक मुंडे यांनी आरोग्याबाबत महिलांना मार्गदर्शन केले. आज ग्रामीण रुग्णालय भोकर येथे महिलांची तपासणी करण्यात आली.
सदरिल अभियानात १८ वर्षावरील सर्व महिला, माता, गरोदर स्रीया यांची संपूर्ण वैद्यकीय आरोग्य तपासणी (बी.पी., शुगर, दंतचिकित्सा व रक्तक्षय) तसेच कर्करोग स्क्रिनिंग, रक्तदाब स्क्रिनिंग, मधुमेह स्क्रिनिंग (३० वर्षावरील सर्व महिला ), माता व बालकांचे लसीकरण, प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक आरोग्य सुविधा देण्यात आल्या.
यावेळी ग्रामीण रुग्णालय भोकर येथील डॉ सारीका जावळीकर बालरोग तज्ञ, पांडुरंग तम्मलवाड, नामदेव कंधारे आरोग्य कर्मचारी, मुक्ता गुट्टे, संगीता पंदिलवाड, सरस्वती दिवटे आरोग्य सेविका आदी उपस्थित होते.