नांदेड| केंद्रात सत्तेवर असलेल्या भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था असलेल्या आरएसएसच्या नागपूर येथील मुख्यालयावर भारत मुक्ती मोर्चा बहुजन मुक्ती मोर्चा व संलग्न संघटनांचा गुरुवार दि. 06 ऑक्टोबर रोजी महारॅली काढण्यात येणार असल्याची माहिती भारत मुक्ती मोर्चाचे नांदेड जिल्हा संयोजक राहुल एंगडे यांनी दिली आहे.
देशभरामध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातून आरएसएस ही हिंदुत्ववादी संघटना बहुजन व मुस्लिम संघटना मोठे कट कारस्थान रचत असून लोकशाहीला धोका पोहोचण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे विविध मागण्यांच्या अनुषंगाने भाजपाची मातृसंस्था असलेल्या आरएसएसच्या नागपूर येथील मुख्यालयावर भारत, बहुजन मुक्ती मोर्चा व इतर संघटनांचावतीने राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांच्या नेतृत्वाखाली दि 06 ऑक्टोबर 2022 रोजी महारॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
या महारॅलीच्या माध्यमातून आरएसएस संविधान विरोधी कारवाया थांबवण्यात, ओबीसीची जातनिहाय जनगनणा करावी, EVM घोटाळा विरोधात आवाज, सरकारी शाळांचे खाजगीकरणाला , बहुजनांच्या प्रेरणास्थळांचे कब्जा थांबवावेत, आदिवासींना हिंदू बनविण्याचे षडयंत्र बंद , इव्हीएम मशीनद्वारे मतदान बंद करावे यासह शेतकरी व महिला समर्थनार्थ ही रॅली काढण्यात येणार असल्याचे भारत मुक्ती मोर्चा संयोजक राहुल एंगडे यांनी सांगितले. यावेळी बुद्धिस्ट नॅशनल नेटवर्कच्या वंदना कांबळे, मूलनिवासी जागृती जत्थाचे किशन मंत्री, जिल्हा उपाध्यक्ष मोहन वाघमारे, कुणाल बगाटे यांच्यासह भारत मुक्ती मोर्चाचे पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.