भोकर/नांदेड। महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार परमपूज्य समाधान महाराज शर्मा केजकर यांचे भोकर तालुक्यात दिनांक 6 व 7 सप्टेंबर रोजी दोन दिवस भोकर शहर आणि तालुक्यातील पाळज या ठिकाणी कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे.
गेल्या अनेक दिवसापासून झी टॉकीजवरील धार्मिक कार्यक्रमातून महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार समाधान महाराज शर्मा यांचे विविध धार्मिक कार्यक्रम प्रसारित होत आहेत. त्यातच भोकर येथील सार्वजनिक शिवजयंती उत्सवातील कार्यक्रमात दिनांक 6 सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजता आणि दिनांक 7 सप्टेंबर रोजी भोकर तालुक्यातील प्रसिद्ध असलेल्या पाळज येथील गणेशोत्सवात राञी आठ वाजता कीर्तनसेवा आयोजित केली आहे. या दोन्ही दिवशी कीर्तन कार्यक्रमास भाविकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजकाच्या वतीने करण्यात आले आहे.