मुदखेड| तालुक्यात बारड पोलीस ठाणे अंतर्गत असलेल्या खांबाळा येथील छायाबाई बापुराव पावडे (वय 55 वर्ष) ह्या 14 सप्टेंबर रोजी सायंकाळी सव्वा सहा वाजताचे सुमारास पाणी भरण्यासाठी पाण्याची मोटार लावत असताना त्यांना विद्युत शाॅक लागला.
घायाळ झालेल्या अवस्थेत त्यांना नांदेड येथील शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले परंतू उपचार सुरु असतांनाच त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी बापुराव माणिकराव पावडे रा. खांबाळा ता. मुदखेड जि. नांदेड यांनी बारड पोलीस ठाण्यात माहीती दिल्यावरून बारड पोलीस ठाण्यात 174 सी. आर. पी. सी. प्रमाणे आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आलीय. या प्रकरणी पुढील तपास जमादार पावडे हे करतायत...