माळाकोळी, बालाजी नागसाखरे। लोहा तालुक्यातील माळाकोळी परिसरात मध्ये विज पडून दोन शेतकऱ्याचा मृत्यू झाला सदर घटना खेडकरवाडी शिवारात सोमवारी सायंकाळी चार वाजता घडली.
गेल्या दोन दिवसांपासून सर्वत्र मुसळधार पाऊस सुरू आहे. त्याच दरम्यान मालकोळी परिसरातील नागदरवाडी येथील संगाबाई तातेराव केंद्रे वय 60 वर्ष व रमनेवाडी येथील पांडुरंग कंधारे या दोन शेतकऱ्यांचा वीज पडून जागीच मृत्यू झाला. माळकोळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथील शासकीय दवाखान्यात दाखल करण्यात आले परिसरात हळहळ व्यक्त करत आहेत.