दक्षिण कोरियाच्या विशेष धनुर्विद्या प्रशिक्षण शिबिरासाठी सृष्टी पाटील जोगदंड ची निवड
नांदेड| जागतिक धनुर्विद्या स्पर्धा व पॅरिस ( फ्रान्स) येथे आयोजित 2024 च्या ऑलम्पिक तयारीसाठी दक्षिण कोरिया येथे आयोजित विशेष धनुर्विद्या प्रशिक्षण शिबिरासाठी दिनांक 28 ऑगस्ट ते ४ सप्टेंबर दरम्यान सोनीपत (साई ) हरयाना येथे आयोजित निवड चाचणीत ज्युनिअर वयोगटात मराठवाडा एक्सप्रेस नावाने ओळखली जाणारी नांदेडची धनुर्वीघेची सुवर्णकन्या कुमारी सृष्टी बालाजी पाटील जोगदंडणे सर्वोत्कृष्ट कामगिरी करीत पुढील महिन्यात दक्षिण कोरिया येथे होणाऱ्या ॲडव्हान्स प्रशिक्षण शिबिरात भारतीय धनुर्वीधा संघात आपली निवड कायम केली आहे.
अतिशय लहान वयापासूनच आपली आई तथा राष्ट्रीय प्रशिक्षिका वृषाली पाटील जोगदंड च्या मार्गदर्शनाखाली ऑलिंपिकचे ध्येय उराशी बाळगत "होय मला ऑलम्पिक मध्ये देशासाठी पदक मिळवायचे आहे" असा चंग मनाशी बांधलेली सृष्टी निवड प्रक्रियेत 2551 गुण मिळवीत तिसरी तर एलिमिनेशन राऊंडमध्ये आपला दबदबा कायम ठेवत राऊंड रॉबिनमध्येही आपले तिसरे स्थान कायम ठेवीत ऑक्टोबर मध्ये दक्षिण कोरिया येथे आयोजित अडवान्स ट्रेनिग कॅम्प साठी भारतीय धनुर्वीधा संघात आपली निवड कायम केली आहे.
आगामी जागतिक धनविद्या स्पर्धा एशियन गेम तसेच पॅरिस फ्रान्स येथे होणारे ऑलिंपिक 2024 चे ध्येय नजरेसमोर ठेवून भारतीय खेळ प्राधीकरण व भारतीय धनुर्वीधा संघाच्या वतिने घेण्यात आलेल्या निवड प्रक्रीयेत सर्वोत्कृष्ठ कामगीरी करीत पुढील प्रवास करणाऱ्या सृष्टीला निवड झाल्याबद्दल भारतीय धनुर्वीद्या संघटनेचे महासचिव प्रमोद चांदुरकर ,ऑलम्पिक प्रशिक्षक रविशंकर सर, ब्रिजेश कुमार, अँड प्रशांत देशपांडे,जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर ,अतिरिक्त पोलीस महासंचालक डॉ. रविंद्र सिंगल , खासदार तथा जिल्हा संघटना अध्यक्ष हेमंत भाऊ पाटील ,आमदार तुषार राठोड , अतिरीक्त पोलीस महासंचालक फत्तेसिंग पाटील महापौर जयश्रीताई पावडे महिला बालकल्याण सभापती अपर्णाताई नेरळकर ,रेखाताई चव्हाण संजय उदावंत ,