हदगाव| महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार पंजाब गणेशराव तालंगकर यांची तालुका अध्यक्षपदी म्हणून निवड करण्यात आलेली आहे.
या निवडीने मणसे तालुक्यातील कार्यकर्ते त्याचे मिञ व चाहते यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण पसरलेले आहे. नियुक्ती पञावर मणसेचे जिल्हा अध्यक्ष रवि राठोड यांची सही असुन त्यांच्या निवडीने कार्यकर्त्यांत नव चैतन्य निर्माण झालेलं आहे. यावेळी त्यांचे स्वागत बालाजी ढोरे, अँड महेश महाजन, अंकुश गोदजे, नितेश डुरके, दिनेश मेहञे, गजानन जासुद यांनी पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.