हिमायतनगरच्या आठवडी बाजारात माल घेऊन येणार टेम्पो उलटून तीन व्यापाऱ्याचा मृत्यू -NNL

मुदखेडजवळ झालेल्या अपघातात तीन ठार, अनेक जखमी


नांदेड|
नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर येथील आठवडी बाजारासाठी तरकारी माल घेऊन जाणाऱ्या आयचर टेम्पो राजवाडी जवळील एका नाल्यावर उलटला असून, या अपघातात तीन जण जागीच ठार झाले. तर अनेक जण जखमी झाले असल्याची माहिती येते आहे, अजूनही टेम्पोखाली काही व्यापारी दबल्या गेल्याची भीती व्यक्‍त करण्यात आली आहे. जखर्मीना मुदखेडच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सदरील अपघात हा चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्यामुळं घडला असल्याचे सांगितले जात आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपाधीक्षक अर्चना पाटील यांच्यासह बारड आणि मुदखेड पोलीस जखमींना व अडकलेल्या बचावासाठी प्रयत्न करत आहेत.  

नांदेड जिल्हयातील मुदखेड येथील व्यापारी हे जिल्हाभरात सर्व आठवडी बाजार करण्यासाठी तरकारी म्हणजे भाजीपाला घेऊन विक्रीसाठी जातात. नेहमीप्रमाणे बुधवार दि.२१ सप्टेंबर रोजी सकाळी हिमायतनगर येथील आठवडी बाजार असल्याने मुदखेडचे व्यापारी (एमएच०४- जीएफ- २७०५) या आयचर टेम्पोमधून हिमायतनगरकडे जात होते. जात असताना सदरील टेम्पो मुदखेड ते भोकर रस्त्यावर असलेल्या राजवाडी जवळील एका वळणावर आला बुधवार सकाळी ९ वाजेच्या सुमारास आला असता टेम्पो चालका ताबा सुटला आणि टेम्पो उलटला. या दुर्घटनेत महंमद हाफिज महंमद हुसेन, मोहम्मद रफीक मोहम्मद अमीन साहब, महंमद चांद महंमद मीरासाहब है तीन व्यापारी जागीच मृत्युमुखी पडले. तर अनेक जण जखमी झाले असून, अजूनही टेम्पोखाली काही व्यापारी दबल्याची भीती व्यक्‍त करण्यात येत आहे. 

घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक अर्चना पाटील, मुदखेडचे पोलीस निरीक्षक महेश शर्मा, बारडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक तुगावे यांच्यासह आदी पोलीस अधिकारी, कर्मचारी यांनी जखमींना रुग्णालयात पाठविण्यासाठी व काही व्यापारी घटनास्थळावर अडकल्याने त्यांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत होते. सर्व जखर्मीना नांदेडच्या आणि मुदखेडच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. मयतांच्या नातेवाईकांनी या ठिकाणी विचारपूस करण्यासाठी गर्दी केली होती.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी