हदगाव, शे चादपाशा| मागील काही दिवसापासून शहरात मच्छारांचा प्रादुर्भाव वाढलेला असुन, यावर प्रतिबंधक उपाय करण्यास न.पा. प्रशासन विसरले आहे. त्यामुळे अज्ञात तापचे रुग्ण वाढत आहेत. यामुळे साथीचे आजार निर्माण होऊन डेंग्यूचा शिरकाव होण्याची शक्यता बळावली आहे.
न.पा. कार्यालयाचे स्वच्छता विभाग माञ या बाबतीत बे-फिकर दिसुन येत आहे. शहरात मलेरिया डेंग्यु इ.अज्ञात रोगाची साथ दिसुन येत आहे. या साथ रोगाची तिव्रता वाढु नये. या बाबतीत शहरातील शासकीय रुग्णालय व न.पा.प्रशासनाकडुन माहीती घेतली असता कोणत्याही प्रकारची उपाययोयोजना दिसुन येत नाही. याबाबतीत फवारणी, धुवारणी करण्यासाठी कोणत्याही प्रकारची मोहीम दिसुन येत नाही.
शहरातील प्रत्येक प्रभागात घाण पाण्याचे डबके साचलेले आहेत. या बाबतीत नागरिकांनी तक्रारी केल्यास त्या तक्रारीची सहसा दखल घेत नसल्याने नागरिकांनी तक्रारी करणेच सोडलेले आहे हे आवर्जून उल्लेख करावा लागेल. शहरात प्रामुख्याने विद्यमान आमदार माजी आमदार यांचे निवास्थानाचा परिसर तसेच माजी खासदार या़च्या निवास्थानच परिसर शहरातील उपजिल्हारुग्णालय परिसर रजा नगर, सभांजी नगर, कमलाई नगर, आझाद चौक, नई अबादी, अट्टल बिहारी नगर, बस्थानक परिसर, मुल्लागली सैलानी नगर, (मारोती मंदीर परिसर) तसेच साठे चौक या भागात धुवारणी करणे अत्यावश्यक आहे.