तुळजापूर पासून सुरूवात झालेले युवा जोडो अभियान युवा सेनेच्या वतीने सुरु आहे. त्यानिमित्ताने लोह्यात युवा सेनेचे विधानसभा संघटक नवनाथ बापू रोहिदासराव चव्हाण यांच्या पुढाकाराने लोह्यात युवा सेनेच्या तीन शाखांचे उद्घाटन व संवाद सभेचे आयोजन करण्यात आले होते. जुना लोह्यातील मारुती मंदिर भागात झालेली सभेला युवा सेनेचे सचिव वरूण देसाई यांनी संबोधित केले व्यासपिठावर ज्येष्ठ नेते माजी आमदार रोहिदास चव्हाण, युवासेना प्रदेश सह सचिव माधव पावडे ,माजी जिल्हाप्रमुख भुजंग, पाटील डक, युवासेना जिल्हाध्यक्ष गजानन सूर्यवंशी युवा सेना राज्य विस्तारक, शरद कोळी विस्तारक, गीता कदम, युवा सेना जिल्हाप्रमुख,महेश खेडकर, माजी जिल्हा परिषद सदस्य पुयड, नगरसेवक प्रतिनिधी संभाजी चव्हाण, युवा सेनेचे कैलास कहालेकर,शहर प्रमुख महेश चव्हाण, भीमराव पाटील ,युवासेनाचे बालाजी गाडेकर, युवा सेनेचे धनराज बोरगावकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शेषराव कहालेकर होते. साहित्यिक मान्यवरांची उपस्थिती होती.
युवा सेनेचे सचिव वरूण सरदेसाई यांनी कोरोनाचे सावट असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी मुख्यमंत्री म्हणून अतिशय चांगले काम केले. मविआ प्रयोग यशस्वी होत होता जर उद्धवजी ची लोकप्रियता अशीच वाढत गेली. इतर राज्यातही सेक्युलर धर्मनिरपेक्ष पक्ष आशेचा किरण म्हणून २०२४ ला पंतप्रधान पदासाठी उद्धव ठाकरे पुढे येतील या भीतीमुळे भाजपने शिवसेना फोडली. ईडी व खोके त्यामुळे हे शिवसेनेला गद्दार झाल्याचा घणघणाती युवा सेनेचे सचिव वरुण देसाई यांनी केला. नवनाथ बापू चव्हाण यांच्या संघटन कौशल्याचे त्यांनी कौतुक करत शाब्बासकी दिली. माजी आमदार रोहिदास चव्हाण यांनी शिवसेना स्थापना पासून कसे आपण जिल्ह्यात संघटन उभे केले याची माहिती दिली व खोके व सतेसाठीचे बोके यावर टीका केले.
माजी जिल्हाप्रमुख भुजंग पाटील डक यांनी मनोगत मांडले. युवा नेते नवनाथ बापू चव्हाण यांनी अभ्यासपूर्ण जोरदार भाषण केले. युवासेनेचे नेते वरुण सरदेसाई यांची शहरातून मोटार सायकल रॅली तसेच फटाक्यांची अतिशबाजी झाली. युवा सेनेच्या तीन शाखाचे उद्घाटन करण्यात आले. खारीक खोबऱ्याचा हार घालून भव्य स्वागत झाके प्रास्ताविक प्रभाकर पाटील पवार यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.संतोष गायकवाड यांनी तर आभार युवा सेना शहर प्रमुख महेश पाटील चव्हाण यांनी मानले.