हिमायतनगर| तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या सरसम बु. येथे ग्रामविकास अधिकारी आणी सरपंच यांनी संगनमत करून चौदाव्या व तसेच पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार केला आहे. या बाबीची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी. अशी मागणी भाजपचे अनू जाती मोर्चाचे तालुकाध्यक्ष दत्ताभाऊ शिराणे यांनी केली आहे.
मुख्यकार्यकारी जि. प. नांदेड यांना दिलेल्या निवेदनात शिराणे यांनी म्हटले आहे की, सरसम बु. येथील ग्राम पंचायत कार्यालयात सन २०२०,२०२१,ते माहे मे २०२२ या कालावधीत ग्रामविकास अधिकारी श्री भोगे यांनी चौदाव्या व तसेच पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीत खोटे दस्तावेज तयार करूण बेकायदेशीर रित्या सादर केले असून योजना व कामे कमी असतांना ती जास्तीची दाखवून निधी उचल केला आहे.
शासनाचे अंदाजानुसार कोणतेही कामे न करताच आपलीच मनमानी चालवून मोठ्या प्रमाणात शासनाच्या निधीत गैरव्यवहार केला आहे. वित्त आयोगाबरोबर ग्राम निधी, करवसुली, फेरफार, पाणी पुरवठा, सौचालय निधीत मोठ्या प्रमाणात अफरातफर करूण शासनाचा निधी हड्डप केला आहे. मोठ्या प्रमाणात शासनाच्या निधीवर डल्ला मारणाऱ्या ग्राम विकास अधिकारी श्री राजेंद्र भोगे यांची खातेनिहाय चौकशी करून दोषीं आढळल्यास त्यांचेवर निलंबनाची कारवाई करावी. अशी मागणी भाजपचे दत्ता शिराणे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कडे निवेदन सादर करून केली आहे.